दमकोंडवाही खदानला मंजुरी नाही – भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा लढा यशस्वी

68

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

प्रतिनिधी: तेजेश गुज्जलवार

भारतीय कम्यूनिस्ट पार्टी (सीपीआय) जल, जंगल आणि जमीन वाचवण्याच्या मुद्द्यांवर एक शतकापासून लढा लढत आहे. एटापल्ली तालुक्याच्या क्षेत्रातील मेंढरी, वांगेतरी, गर्देवाडा, गट्टा, जांबिया ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांचा पवित्र डोंगर दमकोंडवाही खदान सुरू झाल्यामुळे धोक्यात येणार असून?

*खदान नको, जंगल आणि शेती पुरेशी*

खदान सुरू झाल्यास जंगलातून मिळणारे तेंदू, बांबू, मोहा, इतर रानभाजी आणि शेती नष्ट होईल. दमकोंडवाही देसवस्थान परिसर खराब होईल?. त्यामुळे नागरिकांना खदान नको आहे. दमकोंडवाही खाण सुरू झाल्यास जंगलातील नैसर्गिक साधनसंपत्ती, तेंदू, बांबू, मोह, रानभाज्या आणि शेती उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली होती. तसेच, स्थानिक आदिवासींच्या पारंपरिक जीवनशैलीवर आणि धार्मिक श्रद्धास्थानांवर गंभीर परिणाम होण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता होती. म्हणूनच, भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वात नागरिकांनी या खाणविरोधात अनेक आंदोलनात हा मुद्दा घेण्यात आला .

*एक वर्षापासून अनेक आंदोलनात हा मुद्दा उपस्थित होता*

भारतीय कम्यूनिस्ट पार्टीच्या नेतृत्वात नागरिकांनी दमकोंडवाही खदान रद्द करण्यासाठी मागील एक वर्षापासून अनेक आंदोलन, निदर्शने ,मोर्चा, धरणे केली. भाकपा, कम्यूनिस्ट जनसंघटना आयटक, एआयकेएस (किसान सभा), एआयएसएफ आणि एआयवायएफच्या आंदोलनात हा प्रमुख मुद्दा बनवण्यात आला.

*आंदोलनाला यश*

या लोकशाही लढ्याला अखेर यश मिळाले असून, जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी पत्राद्वारे कॉ. सचिन मोतकुरवार यांना लेखी सूचना देऊन स्पष्ट केले की, दमकोंडवाही खाणपट्ट्यास मंजुरी देण्यात आलेली नाही.

*भारतीय कम्यूनिस्ट पार्टीचा संघर्ष*

भारतीय कम्यूनिस्ट पार्टी नेहमीच जनतेच्या हक्कांसाठी लढा लढत असते. दमकोंडवाही खदान रद्द करण्याचा निर्णय हा भारतीय कम्यूनिस्ट पार्टीच्या संघर्षाचा विजय आहे असा मानल्या जाते.

*भारतीय कम्युनिस्ट पार्टी*
*एटापल्ली तालुका*