मुलचेरा येथे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद गडचिरोलीची सभा व तालुका कार्यकारणी गठीत #jantechaawaaz#news#portal#

45

काल दि. २०/४/२०२३ रोजी राष्ट्रीय शहीद विर बाबुराव शेडमाके सांस्कृतिक भवन, मुलचेरा येथे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली जिल्हा गडचिरोली च्या वतीने तालुका मुलचेरा येथे आदिवासी पारंपरिक पद्धतीने सभा आयोजित करण्यात आली होती. अ.भा.आ.वि.परिषद चे प्रदेशाध्यक्ष लकी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली
 अ.भा.आ.वि.परिषद चे विदर्भ कार्याध्यक्ष विनोद मडावी, युवा जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे यांच्या उपस्थित मुलचेरा तालुक्यात संघटना बांधणी करण्यात आली.  तालुका अध्यक्षपदी  सतिश पोरतेट,शहर अध्यक्ष सुरज सिडाम,ता. उपाध्यक्ष संदीप तोरे, ता. सचिव उमाकांत आत्राम,ता. सह-सचिव गुरुदास कडते,ता. संघटक महेंद्र आत्राम,ता. जेष्ठ सल्लागार मधुकर वेलादी,ता. जेष्ठ सल्लागार दिलीप आत्राम,ता. जेष्ठ सल्लागार रमेश
 कुसनाके,ता. जेष्ठ सल्लागार सुभाष आत्राम,ता‌. जेष्ठ सल्लागार दिपक परचाके,ता. संपर्क प्रमुख राकेश मरापे,ता. मिडीया प्रतिनिधी पदी केजीकराव आर के याप्रमाणे तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली.
सभेत सुशिक्षित बेरोजगारांच्या नौकरभरती , सुरजागड लोह-प्रक्लपा पासून स्थानिक जनतेला होणारा त्रास व आदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.
 यावेळेस मुलचेरा तालुक्यातील आदिवासी पाड्यातील युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.