भगवंतराव महाविद्यालयात स्पर्धापरिक्षा मार्गदर्शन #jantechaawaaz#news#portal#

45

एटापल्ली :- भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली, जिल्हा गडचिरोली येथे 21 एप्रिल 2023रोजी स्पर्धापरिक्षा मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डाँ.एस.एन. बुटे होते, तर प्रमुख मार्गदर्शक मा.श्री. विजयानंद पाटील(प्रभारी ठाणेदार, एटापल्ली) आणि मा.श्री. रविराज कांबळे(पोलिस उपनिरीक्षक, एटापल्ली) तसेच प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री.डि.व्ही. पोटदुखे प्राचार्य,भगवंतराव कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली

 प्रा.डाँ.सुधीर भगत, प्रा.डाँ.बि.डी. कोंगरे, प्रा.विनोद पत्तीवार, प्रा.डाँ.व्हि.ए. दरेकार, प्रा.निलेश दुर्गे, प्रा.राजीव डांगे, प्रा.चिन्ना पुंगाटी, प्रा.अतुल बारसागडे, प्रा.राहूल ढबाले, प्रा.डाँ. साईनाथ वडस्कर आदी उपस्थित होते.
याकार्यक्रमाची सुरूवात प्राचार्य डाँ.एस.एन. बुटे आणि मा.विजयानंद पाटील सरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प मालार्पण आणि दीप प्रज्वलीत करून केले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक मा.श्री. विजयानंद पाटील प्रभारी ठाणेदार, एटापल्ली

 आणि मा.श्री. रविराज कांबळे(पोलिस उपनिरीक्षक, एटापल्ली) यांनी विद्यार्थ्यांना  स्पर्धा परिक्षेविषयी मौलाचे मार्गदर्शन केले.        याकार्यक्रमाचे संचालन प्राध्यापिका डाँ. स्वाती तंतरपाळे मँडम तर आभार प्रदर्शन आदित्य राऊत यांनी केले.

याकार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी तथा बहूसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.