बुथ सशक्तिकरण अभियान व विस्तारक,शक्तीकेंद्र,बुथप्रमुख यांचा आढावा बैठक #jantechaawaaz#news#portal#

43

खासदार अशोकजी नेते व वि.प.आमदार डॉ.रामदासजी आंबटकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले

दिं. २१ एप्रिल २०२३

धानोरा:-बूथ सशक्तिकरण अभियान आढाव्याच्या संदर्भात धानोरा तालुक्याची संगठनात्मक बैठक क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोकजी नेते व वि.प.आमदार डॉ.रामदासजी आंबटकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत धानोरा येथील साळवे यांच्या घरी पार पडली.

जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा यांनी उपस्थितांना बुथ सशक्तिकरण अभियानाच्या संदर्भात प्रस्तावनापर माहिती दिली.
त्यानंतर खासदार अशोकजी नेते यांनी तालुका पातळीवर सुरू असलेल्या बूथ रचनेचा आढावा घेत

तालुक्याची उर्वरित बुथ रचना लवकरात लवकर पुर्ण करणे,सरल ॲप प्रशिक्षण, धन्यवाद मोदीजी पत्रे, फ्रेंड ऑफ बीजेपी अशा विविध संगटनात्मक विषयांवर पदाधिकारी -कार्यकर्त्यांना विस्तृत मार्गदर्शन केले.

आणि दि. ३० एप्रिल रोजी होणाऱ्या शंभराव्या मन की बात कार्यक्रमाचे उत्तम आयोजन करण्यासंदर्भात सर्वांनी बुथनिहाय नियोजन करावे अशी सुचनाही बैठकीदरम्यान केले.

तसेच वि.प.आमदार डॉ.रामदासजी आंबटकर,यांनी उर्वरित बुथ रचना व अन्य संगटनात्मक कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी परिश्रम घ्यावे असे आवाहन केले.

याप्रसंगी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते वि.प.आमदार डॉ. रामदासजी आंबटकर, भाजपाचे जेष्ठ नेते तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुरावजी कोहळे,प्रदेश 

सरचिटणीस एस.टी मोर्चाचे प्रकाशजी गेडाम, जिल्हा संघटन महामंत्री रविंद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, तालुकाध्यक्ष शशिकांत साळवे, लताताई पुन्घाटी,जेष्ठ नेते साईनाथ साळवे, उपाध्यक्ष अनिल पोहनकर, युवा नेते सारंग साळवे,युवा नेते साजन गुंडावार,नगरसेवक संजू कुंडू, नगरसेवक लंकेश म्हशाखेत्री, सुभाष धाईत,सुभाष खोबरे,संजय मेश्राम, बुथप्रमुख,शक्तीकेन्द्र प्रमुख,विस्तारक, पदाधिकारी उपस्थित होते