मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
*अहेरी:-* अहेरीतील बोधिसत्व बहुद्देशीय सामाजिक विकास मंडळा तर्फे सामाजिक प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.त्यात डाॅ. विलास खरात यांनी रामायण,महाभारत व इतर धर्मग्रंथाबाबत आक्षेपार्ह विधाने केली व ब्राम्हण समाजावर विखारी टिका केली त्या वादग्रस्त वक्तव्यामुळे हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्याने ३०/१२/२४ रोजी पोलिसात तक्रार देण्यात आली होती त्या वेळेस रात्रो १२ वाजे पर्यंत मोठा जमाव पोलिस स्टेशन समोर होता .काल पुन्हा सकाळ पासुन पोलिस स्टेशनला या प्रकरणाविरुध्द नागरीकांचे घोळके पोलिस स्टेशनला जमा होते.शेवटी रात्रो स्वतः अतिरीक्त पोलीस अधिक्षक श्री लोढा यांनी जमावाची समजुत घालून संबंधीत व्यक्तीवर भा.दं.वि. २९९,२२३ व३(५) अन्वये गुन्हा दाखल झाल्याचे व चौकशीनंतर आयोजकांवर सुध्दा गन्हा दाखल होणार असल्याचे सांगितले.परंतू नागरीकांचे समाधान न झाल्याने बंद पुकारण्यात आला होता.
त्या बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाल्याने बाजारपेठा,टपर्या सर्व बंद असल्याने नविन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वत्र शुकशुकाट पसरले आहे.