नक्सल प्रभावित भागातील 16 आदिवासी युवक दिल्लीला रवाना

95

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

*प्रतिनिधी :- तेजेश गुज्जलवार

दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी 191 वी वाहिनी, केंद्रीय राखीव पोलीस बल (CRPF) यांच्या कमांडेंट श्री सत्य प्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम भागातील 16 आदिवासी युवकांना युवा आदान-प्रदान कार्यक्रम (TYEP) अंतर्गत राष्ट्रीय राजधानी दिल्लीला अभ्यासभ्रमंतीसाठी रवाना करण्यात आले.

या कार्यक्रमाचा उद्देश वामपंथी उग्रवादग्रस्त भागातील युवकांच्या आकांक्षा वाढवणे, माओवादी प्रचाराला प्रतिकार करणे, आदिवासी युवकांना विकासाची संधी, औद्योगिक प्रगती, आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची माहिती देणे आहे. तसेच, या कार्यक्रमामुळे आदिवासी समाजातील युवक व देशातील इतर भागातील त्यांच्या समवयस्कांमध्ये भावनिक नाते विकसित करण्याचा प्रयत्न केला जातो.

या प्रसंगी CRPF चे उप कमांडेंट श्री उमा शंकर प्रसाद, निरीक्षक रेवा शंकर योगी आणि निरीक्षक सत्यपाल अग्रवाल उपस्थित होते.