मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
अहेरी: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अहेरी जिल्हाचे 28 व 29 डिसेंबर 2024 या दरम्यान दोन दिवसीय जिल्हा अभ्यास वर्ग रोल प्रकल्प चिचगुंडी अहेरी येथे घेण्यात आले. 28 डिसेंबर रोजी अभ्यास वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटक म्हणून गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य तनुश्री ताई आत्राम यांची प्रमूख उपस्थिती होती. ताईंनी विद्यार्थीना शैक्षणिक व सामाजिक विषयात मार्गदर्शन केले. अहेरी जिल्हातुन एटापल्ली, भामरागड, मुलचेरा, अहेरी तालुक्यातील 75 विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. या अभ्यास वर्गात 8 सत्रांचा समावेश करण्यात आला. यामधे अ. भा. वि. प. ची सैद्धांतिक भूमिका, पंच परिवर्तन , महाविद्यालय काम संपर्क, सक्षम शाखा,बैठक, अर्थसंकलन, वस्तीगृह संपर्क, सोशल मीडिया,आयाम, कार्य,गतीविधि अशा विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले. समारोप सत्रात मुख्य अतिथी म्हणून संतोष जी मद्दीवार, गडचिरोली /अहेरी जिल्हा संघटन मंत्री राहुल जी श्यामकुवर यांची उपस्थिती होती. राहूल जी यांनी अहेरी जिल्हा समिती घोषणा केली व समारोपिय भाषण केले. वर्षभर झालेले कार्यक्रम, आगामी कार्यक्रम, युवक सप्ताह 3 ते 12 जानेवारी 2025 आणि 53 वे विदर्भ प्रांत अधिवेशन नागपुर 28,29,30 जानेवारी 2025 अधिवेशनाचे महत्त्व समजावून दिले अशा विविध विषयावर बोलतांना कार्यकर्ते व विद्यार्थ्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली. या अभ्यास वर्गात पंकज जी नारनूरवार, जिल्हा संघटन मंत्री राहुल जी श्यामकुवर, जिल्हा संयोजक रोहित श्रीरामवार, अहेरी नगर उपाध्यक्ष आदेश मंचरलावार सर, रोहित मूक्कावार, रितिका दांडिकवार, आयुष्य मामीडवार, कृष्णा गुप्ता, राजू खोब्रागडे, हेमा लखमवार प्रणाली कन्नाके, जया चौधरी, सानिया बावणे, छाया राऊत, युवराज अमलपुरीवार व अन्य अ. भा. वि. प.कार्यकर्ते उपस्थित होते.