मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
प्रतिनिधी:- तेजेश गुज्जलवार
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) च्या शताब्दी वर्षानिमित्त, 26 डिसेंबर 2024 रोजी रेकलमेटा ग्रामपंचायत, गर्देवाडा, तालुका एटापल्ली येथे भाकपा एटापल्ली कौन्सिलच्या आयोजनाखाली भव्य शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन भाकपा अहेरी विधानसभा अध्यक्ष कॉ. सचिन मोतकुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10 वाजता गाव पाटील महादू कावडो यांच्या हस्ते पक्ष ध्वजारोहणाने झाली. या प्रसंगी गावकरी पूर्ण तालुक्यातील शेकडो शेतकरी, शेतमजूर, आणि युवक-युवतींसह शेकडो नागरिक उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांत आदिवासी युवक-युवतींनी नृत्य व गाण्यांची रंगतदार प्रस्तुती केली, ज्यामुळे वातावरण उत्साहपूर्ण झाले. यानंतर सर्वांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, ज्यामुळे उपस्थित नागरिकांना एकत्र येण्याची संधी मिळाली.
या कार्यक्रमाला ऑल इंडिया किसान सभा तालुका अध्यक्ष कॉ. रमेश कावडो, तसेच कॉ. विशाल पूजजलवार, कॉ. शुभम वन्नमवार,कॉ. पत्रकार तेजस गुज्जलवार,महादू कवडो गाव पाटील रेकलमेट्टा , शिलाताई गोटा माजी प. स सदस्या, डोळगे गोटा माजी सरपंच गट्टा, सत्यनारायण पूज्जलवार गट्टा, मादी लाटी नरोटी माजी सरपंच वटेली, बिरजू आतलामी वाळवी, मुरा नरोटी बेसेवाडा, सत्तू दोरपेटी हाचबोडी, सत्तू दोरपेटी गर्देवाडा, राकेश कवडो पुस्कोटी, दिनेश लेकामी गिलनगुडा, मनोहर लेकामी, मधू नरोटी, संजय पूज्जलवार, राकेश मल्लिक, बंडू हेडो, रामदास उसेंडी, छाया जेट्टी टिटोला, सुनीता कवडो, देवाजी मटामी सचिव ग्रामसभा पार्सलगोंदी,रितेश जोई, शंकर कुळयेटी तोडगट्टा, शंकर पुंगाटी, दलसू पुंगाटी, चेतन पुंगाटी,कटिया गोटा,पत्तू पोटावी ग्रामसभा दोडुर, रामलू गोटा, तानाजी मटामी नैणवाडी, विलास नोरोटी सचिव गर्दवाडा अविका,दानू पल्लो पाटील मर्दाकुही, सत्तू हेडो पाटील मर्दाकुही, धर्मा तिम्मा पाटील मेड्री, डोलेश नरोटी पाटील वांगेतूरी,साई कवडो, गिल्लू कवडो, रामलू कोरसा, बारसु उईके नैताला, रामलू गोटा मुरेवाडा,रामणटोला सुरेश जोई गोरगुट्टा,आकाश पदा,चंदू आत्राम येलदर्मी, मोनिका मॅडम , यांच्यासह अनेक भाकपा सदस्यांनी व सर्व तालुक्यातील समर्थकांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन भाकपा सदस्य, ग्रामस्थ, शेतकरी, शेतमजूर, आणि आयटक सदस्यांच्या AIKS सदस्य, AIYF सदस्य, व इतर जनसंघटना आणि नागरिकांचा सहकार्याने शक्य झाले.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या 100 वर्षांच्या संघर्षमय वाटचालीला वंदन करत, या महोत्सवाने एकजुटीचा संदेश दिला यामुळे येणाऱ्या काळात एटापल्ली तालुक्यात लाल वादळाची शक्ती नक्कीच वाढणार आणि शेतकरी, कष्टकरीचे प्रश्न मार्गी लागणार अशी अश्याची किरण उदयास आली….