खासदार अशोक नेते यांची विरखल (चक) येथे सांत्वनपर भेट #jantechaawaaz#news#portal#

115
.२३ एप्रिल २०२३
सावली: मान.खासदार अशोक नेते यांनी सावली तालुक्यातील विरखल चक येथे स्व.मंदा एकनाथ सिडाम हया महिलेला वाघाने ठार केल्या संदर्भात गावकऱ्यांसह, वाघाच्या दहशती संबंधी व गावातील विविध समस्या च्या विषयासंबंधी दिं.२३ एप्रिल २०२३ ला वनविभागाचे कर्मचारी, अधिकारीवर्ग, नायब तहसिलदार कांबळे साहेब,कृषी अधिकारी अश्विनी घोडसे,सावली पोलीस स्टेशनचे मडावी साहेब, विरखल चक चे पोलीस पाटील आनंदराव गंडाटे,यांच्यासह चर्चा करून आढावा घेत बैठक घेतली.
याप्रसंगी खासदार महोदयांनी आर्थिक मदत सुद्धा केली.
   यावेळी मा.खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते,भाजपा सावली तालुकाध्यक्ष अविनाश पाल,व्यापारी तथा सामाजिक कार्यकर्ते
 संतोष थोराक,उपसरपंच दिपमाला निकुरे, राजेंद्र निकुरे,प्रभाकर चिमुरकर,वर्षा चिमुरकर,यांच्यासह अनेक कार्यकर्ते व गावातील नागरिक  उपस्थित होते.