मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
:- सुरेश एम तिट्टीवार
सिरोचा
सिरोंचा मुख्यालया पासून सात कि.मी अंतरावर असलेला आरडा गावातील स्वयमभु मल्लीकार्जुन(खंडोबा) स्वामी मंदिर परिसरात 300 वर्षाची परंपरा असलेल्या बोनालु (यत्रा) उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने सिरोंचा तालुक्यातील व तेलंगणा, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, छेतीसगड राज्यातील जवळपास 35 हजार भाविकांच्या गर्दीने मल्लीकार्जुन(खंडोबा) स्वामी मंदिराचा परीसर गर्दी फुलून दिसत होते.
आरडा गावात असलेल्या
मल्लीकार्जुन (खंडोबा) स्वामी मंदिरात दरवर्षी डिसेंबर महिन्यात याञ भरते. कडक्याच्या थंडीत सुध्दा भाविकांनी आपली हाजरी दर्शवली
यावर्षी सुध्दा मल्लिकार्जुन स्वामी बोनालू यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
मल्लीकार्जुन (खंडोबा) स्वामी यांचे भक्तगण सिरोंचा तालुक्यासह तेलंगणा व छत्तीसगड,आंध्रप्रदेश, महाराष्ट्र राज्यात आहेत. आणि ते या बोनालू उत्सवाला न चुकता आपल्या परिवारासह हजेरी लावतात.
या ठिकाणी उत्सावादरम्यान विविध प्रकारची दुकाने दोन दिवस लावलेली असते.
भक्तगण मल्लीकार्जुन स्वामींचे दर्शन घेऊन पुजाअर्चा करतात. आपली मनोकामना पूर्ण व्हावी, यासाठी स्वामीना साकडे घालतात. बोनालु म्हणजे एका कलशात प्रसादरुपी साखर किंवा गुडा चि खिर मातिच्या मटक्यात शिजविली जाते. शिजलेली खिर मटक्यात फुलाच्या हार हळदी व कुंकुम रंग रगोटी तयार करुण ठेवली जाते. नंतर ते मडके डोक्यावर
ठेऊन मंदिराच्या भोवताल तीन प्रदक्षिणा करतात.
व नन्तर मडक्यात शिजविलेली प्रसाद दर्शनासाठी आलेले भाविकाना प्रसाद स्वरुपात दिली जाते
हि यात्रा सिरोंचा तहसील साठी आकर्षनाचे केंद्र बिंदू ठरले आहे.