नवयुवक क्रीडा मंडळ,मारदा आयोजित कबड्डी स्पर्धांचे उद्घाटन मा. डाॅ.सोनलताई कोवे हिचे हस्ते

69

अनिल कांदो तालुका प्रतिनिधी चामोर्शी
मो.नं.९८३४४७५६८०
दिनांक -०५/१३/२०२४

चामोर्शी – तालुक्यातील मौजा मारदा येथे नवयुवक क्रीडा मंडळाच्या वतीने भव्य प्रोढांचे ग्रामीण कबड्डी व व्हाॅलीबाल स्पर्धा आयोजित केले.सदर स्पर्धेचे उद्घाटन -मा.डाॅ.सोनलताई कोवे सह उद्घाटन- मा.रमेशजी अधिकारी जिल्हाअध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना, गडचिरोली अध्यक्ष -मा.ब्रहाम्हनकर सर मुख्याध्यापक शासकीय आश्रमशाळा,पोटेगाव दिपप्रज्वलन -मा.प्रणय खुणे सर प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना म.रा. उपाध्यक्ष -मा.डाॅ.चेतन कोवे, गडचिरोली प्रमुख पाहुणे-मनोहर पोटावी सरपंच मारदा सौ.रेखाताई कोराम शिक्षिका तोहगाव श्री.निमगडे सर अधिक्षक शा.आश्रमशाळा पोटेगाव श्री शिवाजी नरोटे सामाजिक कार्यकर्ते श्री.कालीदास कड्यामी भुमिया मारदा श्री आसुटकर साहेब सौ.प्रेमिला नरोटे उपसंरपच मारदा श्री केशव कड्यामी पोलिस पाटील मारदा कु दुग्गा मॅडम तलाठी कु.रंजना तलांडी वनरक्षक सौ.कांताबाई हलामी सरपंच सौ.निर्मला पोटावी अंगणवाडी सेविका संतोष वड्डे ग्रामसभा अध्यक्ष मारदा धर्माजी दुर्वे सविता पोटावी पोलिस पाटील देवापुर यांचे उपस्थित उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

भव्य प्रोढांचे ग्रामीण कबड्डी व व्हाॅलीबाल स्पर्धांचे आयोजकांनी सहभागी कबड्डी विजेता संघास प्रथम क्रमांक पारितोषिक रु. २५०००/- द्वितीय क्रमांक पारितोषिक रू.२००००/- तृतीय क्रमांक पारितोषिक रु.१५०००/रोख रक्कम व व्हाॅलिबाल विजयी संघास प्रथम क्रमांक पारितोषिक रु.२००००/-द्वितिय पारितोषिक रु.१५०००/-तृतिय पारितोषिक रु.१००००/-रोख रक्कम अंतिम विजयी संघाना पारितोषिक देण्यास आयोजित केलेआहे. उद्घाटन प्रसंगी मा.डाॅ.सोनलताई कोवे सहभागी सर्व संघांनी खेडाळुवृतीने आपल्याकडे असलेल्या कौशल्याचे मैदानावर दाखवून विरोधी संघांवर मात करावे असे सर्व संघातील खेळाडू यांना आवाहन केले.तर मा.खुने सर यांनी सहभागी संघातील खेळाडू कोणत्याही वादविवाद न करता आयोजकांनी निवड केलेल्या पंचांची निर्णय अंतिम राहील याची जाणीव ठेवावी आणि आपली खेळाडू वृत्तीने खेळ करावे असे सांगितले. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी उपस्थित सर्व संघातील खेळाडू यांना चांगले खेळ करण्याचा शुभेच्छा दिले.

कार्यक्रमा प्रसंगी नवयुवक क्रीडा मंडळ अध्यक्ष विश्वनाथ नरोटे सचिव प्रशांत नरोटे सचिव योगराज कड्यामी कोषाध्यक्ष प्रकाश नरोटे क्रीडा प्रमुख माणिक कड्यामी व मंडळाचे सर्व सदस्य तसेच गावकरी यांनी सहभागी होऊन सहकार्य केले.