संस्कार शाळेत दिवाळीची सुट्टी, “वोकल फॉर लोकल” आणि समाजाभिमुख उपक्रम

224

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

*प्रतिनिधी: तेजेश गुज्जलवार*

दिवाळीच्या सुट्टीत संस्कार पब्लिक स्कूल ने विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रमांची मालिका राबवली आहे. “वोकल फॉर लोकल” या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी, विद्यार्थ्यांनी स्थानिक उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन केले जात आहे. याच अनुषंगाने विद्यार्थ्यांनी छोट्या दुकानदारांकडून वस्तू खरेदी करून तसेच स्थानिक दिवे विक्रेत्यांकडून दिवे घेऊन त्यास रंगवून वापरणे या द्वारे “मेड इन इंडिया” उत्पादनांना प्राधान्य देण्याचे शिक्षण दिले जात आहे. विध्यार्थ्यांना स्वतःचे काम स्वतः करण्याची सवय लागावी म्हणून स्वयंसेवा, घरकामात पालकांना मदत करणे, संस्कार सीड बँकेत फळांची बिया जमा करणे याशिवाय, गरजूंसाठी फराळ वाटप उपक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः फराळ बनवून ते गरजू कुटुंबांना वितरित करून समाजातील एकोप्याचा संदेश दिला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य आणि सेवा भावाचे बीजारोपण होत आहे.

विद्यार्थ्यांसाठी सुविचार आणि श्लोक पाठांतराचे देखील आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने एक श्लोक पाठांतर करून सादर केला. हे उपक्रम विद्यार्थ्यांच्या मानसिक व आध्यात्मिक विकासाला चालना देणारे व्हावे हा आमचा उद्देश आल्याचे संस्थापक विजय संस्कार व मुख्याध्यापिका पूजा संस्कार यांनी सांगितले.

संस्कार संस्थेद्वारा स्थापित संस्कार पब्लिक स्कूल च्या या उपक्रमांनी समाजात सकारात्मक संदेश पोचवून प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे.