गडचिरोली: आमदार देवराव होळी यांनी घेतला नामांकन अर्ज मागे आमदार डॉ. देवराव होळी प्रदेश उपाध्यक्षपदी

59

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

गडचिरोली :-अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या गडचिरोली विधानसभा क्षेत्राकरिता विद्यमान आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून भारतीय जनता पार्टीची डोकेदुखी वाढवण्याचे काम केले होते. पण पक्षाच्या वरिष्टानी लक्ष घालून डॉ. देवराव होळी यांची यांना समज देऊन आपला नामांकन अर्ज मागे घेण्यासाठी भाग पाडले. आज आमदार डॉ. देवराव होळी यांनी आपला अर्ज मागे घेतला त्याप्रसंगी विधानसभा प्रभारी प्रमोद पिपरे व गडचिरोली भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे हजर होते.

विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी हे पक्षातच राहून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांचा प्रचार करणार आहेत व पक्ष विजयासाठी प्रयत्न करणार आहेत.

*आमदार डॉ.देवराव होळी प्रदेश उपाध्यक्षपदी*

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी आमदार डॉ. देवराव होळी यांची निवड प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली आहे त्यांच्या निवडीबद्दल भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.