शांतीग्राम व गीताली परिसरातील राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश.
मुलचेरा : तालुक्यातील शांतीग्राम व गीताली येथील भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार)गटाचे अनेक पदाधिकारी ब कार्यकर्त्यांची आप आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केले.
सदरहू पक्ष प्रवेश शांतीग्राम व शीतली दोन्ही ठिकाणी घेण्यात आली.येथील पक्षा प्रवेश कार्यक्रमला काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला असून पक्षप्रवेश केलेल्या सर्व नवोदित कार्यकर्त्यांची काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा समन्वयक अजयभाऊ कंकडलवार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हनमंतू मडावी यांनी पक्षाचे दुपट्टे अन् पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अहेरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षात इतर पक्षांचे कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात इंनकमिंग सुरू असल्याने याची फायदा येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गीताली येथील समीर रॉय,रॉबिन मंडल, पार्थ मंडल,अनुप मंडल,सौरभ बैरागी,अनिकेत बैरागी,अनिकेत बिश्वास,संजय मंडल,नवीन मंडल,अटल मंडल,तपण रॉय,पिंकू मंडल,उज्वल मुखर्जी,तापण सरकार,गोमासे सर मल्लेरा तसेच शांतिग्राम येथील सुब्रत मंडल,तपण मिस्त्री,जयदेव समजदार,बिदूर डे, रमेन मांझी,सुजन मिस्त्री,शिवशंकर मिस्त्री,सुज्जान समजदार,माधव समजदार,राजीव विश्वास,रामप्रसाद सरकार,प्रवीण बेपारी, मिंटू पाल,निरंजन बाला,बबलू बैरागी,देवब्रते मंडल,आनंद बाईन,केशव सरकार,संजीत मंडल,कमलेश माझी,प्रदीप बिश्वास,आशिष मंडल,जहरलाल हलदार,दीपक मंडल आदींनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश घेतले.
पक्षप्रवेशा दरम्यान मुलचेरा तालुक्यातील श्रीकांत हलदार उपसरपंच,अजय नैतांम माजी जि.प.सदस्य,कार्तिक तोगम माजी उपसरपंच,सुरेश आत्राम उपसरपंच,अज्जूभय्या पठाण माजी सरपंच,आनंदराव वेलादी,चलावार काका,अशोल येलमुले माजी उपसरपंच,गोपाल कविराज कॉग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष अहेरी विधानसभा,कालिदास कुसनाके,वसंत समजदार,लक्ष्मीबाई वेलादी, रवी मंडल,उज्वल मुखर्जी,संदीप बिश्वास,परमेश्वर पाल,निर्मल मंडल,साईनाथ पनेमवार, व्येकटेश धानोरकर,रामटेके सर आदी मान्यवर उपस्थित होते.