प्रत्येकांनी मतदान वाढविण्यासाठी प्रयत्न करावे – प्रकल्प अधिकारी नवीन गोयल

238

*प्रतिनिधी: तेजेश गुज्जलवार*
एटापल्ली : लोकशाही मध्ये निवडणुकांना सर्वोच्च स्थान आहे. येत्या 20 नोव्हेंबरला राज्य विधी मंडळाच्या विधानसभा या सभागृहाच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुका ची जनजागृती करणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असून स्थानिक परिसरात 80% च्या वर मतदान देण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन प्रकल्प अधिकारी व उपविभागीय अधिकारी नवीन गोयल यांनी केले.
यावेळेस तहसीलदार हेमंत गांगुर्डे, गटशिक्षणाधिकारी एस. एन. कुमरे, महसूल कर्मचारी पंकज उसेडी, जगदीश सिडाम, नगर पंचायतचे रसाळ, प्राचार्य डी. व्ही. पोटदुखे, ए आर एस शेख, बी.पी. राजुरकर, सौ. ममता झिलपे, सी. एन.घोंगडे, एन. एन. दडमल, पी. डब्लू.सातपुते, व्ही.आर. देवगडे, एस. के. झीलपे, सौ एस. डी. पोटदुखे,व्ही आर.मोतकूरवार, कुमारी वाय. बी. रत्ने यांची उपस्थिती होती.
जनजागृती फेरीची सुरुवात भगवंतराव माध्यमिक आश्रम शाळा, एटापल्ली येथून झाली. शहराच्या प्रमुख मार्गाने निवडणुकी संदर्भात घोषणाबाजी करून जनतेचे लक्ष वेधून घेतले. ढोल ताशाच्या निनादात काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. जनजागृती फेरी नगरपंचायत च्या पुढे गेल्यावर प्रकल्प अधिकारी व उपविभागीय अधिकारी नवीन गोयल यांनी फेरीला मार्गदर्शन करून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनतेने पुढे यावे व लोकशाही बळकट करावी असे आवाहन केले.
मतदान जनजागृती बाबत चित्रकला व पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भगवंतराव माध्यमिक आश्रम शाळेच्या विद्यार्थिनींनी सुरेख रांगोळ्या काढून युवा व नवीन मतदारांना मतदानाबाबत आकर्षित केले.