बुद्ध जयंती निमित्त नागसेन बुध्द विहार, आलापल्ली येथे खुली चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली #jantechaawaaz#news#portal#

41

प्रतिनिधी//
होती. त्यानिमित्त दिनांक ०५.०५.२०२३ ला सायंकाळी ठीक ७.३० वाजता बक्षीस वितरणाचा सोहळा नागसेन बुध्द विहार येथे पार पडला. त्या स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या स्पर्धकांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह तसेच इतर स्पर्धकांना सुध्दा
 प्रोत्साहनपर बक्षीस वितरण करण्यात आले.
        प्रथम बक्षीस लक्ष्मण रत्नम शिक्षक व प्रकाश मुंजमकर यांच्याकडून, द्वितीय बक्षीस नागसेन बुध्द विहाराचे अध्यक्ष चंद्रप्रकाश कोरडे तर तृतीय बक्षीस आशिष पाटील यांच्याकडून रोख रक्कम प्रदान करण्यात आले होते.
       बक्षीस वितरण सोहळ्याला ॲड. प्रकाश गलबले साहेब, डॉ. नैताम मॅडम, लक्ष्मण रत्नम शिक्षक, विहाराचे अध्यक्ष चंद्रप्रकाश कोरडे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मुंजमकर, आशिष पाटील, इ. मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुरेंद्र तावाडे सर तर आभार प्रदर्शन निकिता बोरकर यांनी पार पडले. 
    चित्रकला स्पर्धेच्या  यशस्वितेसाठी प्रा. सुरेंद्र तावाडे, शैलेश राऊत,  निकिता बोरकर, आयु. संगीता तावाडे, अश्विनी शेळके, अश्विन बोरकर, भीमराव जुनघरे, आतिश रामटेके इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.