मका हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे.अन्यथा शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मध्ये भरलेला मका विक्री साठी तहशिल कार्यालयात आणनार #jantechaawaaz#news#portal#

66
प्रतिनिधी//

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून इशारा.










आरमोरी – गेल्या वर्षी मका पिकाचे भरघोस उत्पादन – येऊनही हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यास उशिर झाल्याने खाजगी व्यापाऱ्यांनी अत्यंत अल्प दाराने प्रतिक्विंटल मका खरेदी केली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. यावर्षीदेखील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड केली

 असून, आता मका पिकाची मळणी देखील झाली आहे. अशातच अवकाळी पावसाने थैमान घातल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांची भरपाई निघावी यासाठी • तात्काळ आरमोरी येथे हमीभाव चार दिवसांच्या आत  मका खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे अन्यथा ट्रॅक्टर मध्ये भरलेला मका विक्री साठी दिनांक १२ मेला आरमोरी तहशिल कार्यालयात आणन्यात येथील असा इशारा गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून इशारा दिला आहे.

शेतकऱ्यांना धानासह मका व इतर शेती उत्पादनाच्या
खचावर आधारीत उत्पन्न मिळावे म्हणून केंद्र शासनाकडून हमीभावाने भरड धान्य खरेदी योजना राबवली जाते. गडचिरोली जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून हमी भावाने मका खरेदी केली जाते. यावर्षात आरमोरी तालुक्यात  मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात मका उत्पादन झाले पण ऐन कापणी व मळणीच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे मक्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली 

आहे. निसर्गाची अवकृपा व त्यातच खाजगी व्यापारी मका खरेदी दरात शासकीय हमी भावापेक्षा कमी भाव देत, मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. पहिलेच शेतकऱ्यांनी धान उत्पादनाचा खर्च न निघाल्याने उसनेऊदार करुन मका पिक घेतले पण  मका खरेदी केंद्र सुरू न झाल्याने खाजगी व्यपारेकडे अवाच्या सव्वा किमतीत विकुण शेतकऱ्यांची नुकसान होत आहे

 .प्रकार थांबवण्यासाठी शासनाने मार्केटींग फेडरेशन मार्फत  आरमोरी येथे चार दिवसांच्या आत शासकीय हमीभाव मका खरेदी केंद्र सुरू करावे, अन्यथा ट्रॅक्टर मध्ये भरलेला मका विक्री साठी दिनांक  १२ मेला आरमोरी तहशिल कार्यालयात आणन्यात येथील असा इशारा गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून इशारा दिला आहे.