मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांचा पुढाकार
पेरिमिली येथे लोकमंगल प्रतिष्टानने आयोजित केलेल्या सर्वधर्मीय विवाह सोहळ्यात गोरज मुहूर्तावर १११ जोडप्याचे शुभमंगल करण्यात आले.यावेळी लोकमंगलचे संस्थापक तथा माजी राज्यमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी उपस्थित दर्शवून नववर-वधूना शुभाशीर्वाद दिला
पेरिमिलीच्या प्रांगणात सायंकाळी नेटक्या स्वरूपात हा सामूहिक विवाह सोहळा पार पडला.यावेळी हिंदू,गोंडी,माडिया,व बौद्ध वर-वधूचाही त्यांच्या धर्म पद्धतीने विवाह लावून देण्यात आला.सर्व वर-वधूना रेशीमगाठी बांधताना शुभाशिर्वाद देण्यासाठी गावच्या सरपंच किरण नैताम,माजी पं. स. प्रशांत ढोंगे,पं. समिती माजी सभापती बोड्डाजी गावडे,बापू सडमेक,मेडपल्लीचे सरपंच निलेश वेलादी,जि. प.माजी सदस्य रामरेड्डी बंडमवार,पल्लेचे सरपंच राजू आत्राम,उपसरपंच राजू सोयाम,भाजपचे तालुका अध्यक्ष रवि नेलकुद्री, नगरसेवक विकास उईके, तसेच पेरिमिली परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
विवाह सोहळ्यापूर्वी सकाळपासून पेरिमिली लगीनघाई दिसत होती.सकाळनंतर भोजनावळी सुरू झाल्या.सायंकाळ पर्यंत सुमारे हजारोंच्या संख्येत वऱ्हाडी मंडळींनी भोजनाचा आस्वाद घेतला.आहेर, रुखवत व इतर विधिकार्याचीस्वतंत्र व नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात
आली.विवाहबद्ध झालेल्या या सर्व वर- वधूना मानाचे आहेर देण्यात आले.राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी सर्व वर-वधूना स्त्री जन्माचे महत्व समजावून सांगितले.स्त्री जन्माचे स्वागत करा, स्त्रीभ्रूणहत्या करू नका अशी शपथ सर्वांना देण्यात आली.त्यानंतर सर्व वर-वधूची वरात ढोल ताशांच्या गजरात सामूहिक काढण्यात आली.राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी वर-वधूचे कन्यादान केले.
सायंकाळी गोरज मुहूर्तावर अक्षता पडल्यानंतर प्रांगणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.सामूहिक विवाह सोहळ्याचे नेटके गडी महाकाली मंडळाने नियोजन केले होते.!