मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
अहेरी:- येथील संत मानवदयाल विद्यालयात सत्य अहिंसा शांती चा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करून या दोन्ही महामानवाना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक पी. बी. येगोलपवार, प्रमुख पाहुणे म्हणून एस. एन. निखाडे, डी. एम. नैताम, कु.एम. पी. ठाकरे,कु. के. एल.राऊत, कु.ए. एस. गणमुकूलवार,कु.पी. एम. तोर्रेम, कु.आर. बी. मेश्राम आदी मंचावर उपस्थित होते.
या प्रसंगी मंचावर उपस्थित मान्यवर महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकला.तसेच विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी या दोन्ही थोर पुरुषांच्या जीवनाबद्दल व गौराबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन राजमनी गुरुनुले तर आभार प्रदर्शन माही खोब्रागडे हिने मानले यावेळी विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते.