मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
सिरोंचा:येथील हजरत वली हैदरशाह बाबा,रहेमतुल्लाह अल्लेह बाबा दरगाह परिसरात सभा मंडप बांधकाम करण्यात येणार असून राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते नुकतेच भूमिपूजन करण्यात आले.
सिरोंचा तालुका मुख्यालयात हजरत वली हैदरशाह बाबा,रहेमतुल्लाह अल्लेह बाबा दरगाह येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात उर्स जत्रेचे आयोजन केले जाते.रात्रीच्या सुमारास शानदार कव्वालीचे देखील आयोजन केले जाते.या दरम्यान महाराष्ट्र,छत्तीसगड आणि तेलंगाणा राज्यातील नागरिकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते.ही बाब लक्षात घेऊन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी याठिकाणी सभा मंडप बांधकामासाठी तब्बल ५० लाखांची निधी दिली.आता येथे सुसज्ज असा सभा मंडप बांधकाम केले जाणार आहे.
रविवार (२९ सप्टेंबर रोजी) मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी याठिकाणी भेट देऊन दर्शन घेत परिसरात सभा मंडप बांधकामाचे भूमिपूजन केले.यावेळी एमआयडी ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष रमजान खान,उपाध्यक्ष फाजील पाशा,सचिव फिरोज खान,गफ्फार पाशा,शाकुर राणा, सल्लार शेख,नगरसेवक जगदीश रालाबंडीवार,नगरसेवक सतीश भोगे,माजी जि प अध्यक्ष समय्या पसुला,माजी प स उपसभापती कृष्णमूर्ती रिकुला,आदी मान्यवर उपस्थित होते.