खासदार डॉ नामदेव किरसान यांची आढावा सभा एटापल्ली इथे पार पाळण्यात आली

95

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

प्रतिनिधी: तेजेश गुज्जलवार

एटापल्ली;
येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित आढावा सभा प्रसंगी प्रशासकीय विभाग प्रमुख, पोलीस,अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विकास कामे करतांना नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन सौजन्याने वागावे असे निर्देश देण्यात आले आहे कारण नौकरी संपल्यावर तुम्ही या ठिकाणी वरून जाता तेव्हा नागरिकांना तुमच्या प्रती प्रेम भाव असायला हवे म्हणून नागरिकांसोबत प्रेमाने वागावे असे निदर्शने दिले.

यावेळी आढावा घेतांना तालुक्यातील रखडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती व नूतनिकरणाच्या कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम अभियंता सुनील बावणे यांना देण्यात आले आहेत. गट्टा प्राथमिक आरोग्य केंद्र रिक्त पदे व इतर आरोग्याच्या समस्या संबधी तालुका आरोग्य अधिकारी वैद्यकीय अधीक्षक डॉ सचिन कन्नके,वैद्यकीय अधीक्षक डॉ तुपेश उईके यांना आरोग्य सेवा सक्षम करून सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून सेवा प्रधान करण्याचे सांगितले, महसूल, विज वितरण, कृषी, वन, भूमिअभिलेख, पंचायत समिती, बाल विकास प्रकल्प व शिक्षण विभाग अशा तालुका स्तरावरील विविध विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपण लोकसेवक या भावनेने गोरगरीब, आदिवासी व अविकसित भागाच्या नागरिकांची सेवा करण्याच्या संधीचे सोने करण्याचे आवाहन केलेत आणि नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या असे सांगितले. यावेळी डॉ नामदेव किरसाण सोबत जिल्हा अध्यक्ष काँग्रेस महेंद्र ब्राम्हणवडे, अजय कंकडालवार माजी जि प अध्यक्ष, हनुमंतू मडावी, रमेश गंपावार तालुका अध्यक्ष तसेच महाविकास आघाडीचे कम्युनिष्ठ पार्टी तालुका सचिव कॉ सचिन मोतकुरवार, शिवसेना युवासेना प्रमुख अक्षय पुंगाटी,तेजेश गुज्जलवार, मनोहर बोरकर, किसन हिचामी, निजान पेंदाम,नामदेव हीचामि व असंख्य कार्यकर्ते व नागरिक.
उपस्थित होते.