गोविंदाचा नारेबाजींनी दुमदुमली सिरोंचा नगरी. अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडून पारितोषिक.

135

मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime

सिरोंचा: श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा सण सर्वत्र मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो.
या दिवशी गोविंदा पथक खुप उत्साही असतात.
दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदाची लगबग सुरू असते.
गोविंदा पथक एकापाठोपाठ एक असा दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान आज सिरोंचा येथील पटवारी कॉलनी येथे मागील तेरा वर्षापासून कान्हा मटकी फोड महिला मंडळ यांच्या वतीने दहीहंडीचा कार्यक्रम सिरोंचा पटवारी कॉलनीत आयोजित करण्यात आला. यावेळी गोविंदा आलारे गोविंदा,जरा मटकी संभाल बुजबाला’अशा घोषणांना संपूर्ण सिरोंचा नगरी दुमदुमली होती.
यावर्षी दहीहंडी कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करावा यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी उत्साह कमी पडू नये म्हणून प्रथम पारितोषिक ३५ हजार,द्वितीय पारितोषिक २५ हजार ठेवण्यात आले होते.मात्र एवढे मोठे पारितोषिक सिरोंचा नगरीत पहिल्यांदाच ठेवण्यात आल्याने बालगोपालामध्ये उत्साह दिसून आला.
दहीहंडी फोड कार्यक्रमात सहा टीमने भाग घेतला होता.
यामध्ये बजरंग दल, वाल्मिकी, धर्मराव विद्यालय,जिल्हा परिषद हायस्कूल,आणि दोन महीला टीम एकूण सहा टिमानी यामध्ये सहभाग घेतला होता.
दहीहंडी फोड कार्यक्रमात अगदी कमी वेळात जिल्हा परिषद हायस्कूलचे चमूने करून प्रथम क्रमांक पटकावला.द्वितीय कमांक क्रमांक राजे धर्मराव हायस्कूलचे चमुणी पटकावला असून प्रथम,द्वितीय आणि सहभाग सर्वच टीमला बक्षीस वितरण करण्यात आले आहे.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण,उद्घाटक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लूरी,माजी नगर सेवक रवी रलाबंडीवार,नगर सेवक सतीश भोगे, नगर सेवक सतीश राचर्लावार,नगर सेविका पद्मा भोगे, नगर सेविका महेश्वरी पेद्दापल्ली,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा महिला उपाध्यक्ष वेंकटलक्ष्मी आरवेल्ली, रवी सुलतान,शंकर बंदेला आदी उपस्थीत होते. कार्यक्रमाचे पर्यवेक्षक म्हणून अ‍ॅड. फिरोज खान आणि जिल्हा परिषदचे शिक्षक सोनेकर हे होते.
कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी कान्हा मटकी फोड ग्रुपचे रेखा तीपट्टीवार,सुरेश पडगिलवार,रमेश तोकलवार, सुरेश तीपट्टीवार,गायत्री रावत,दीपा रावत,बबलू मदेशी,रश्मि सोनेकर आदींनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार जगदाबी यांनी केले.
यावेळी कोणतीही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सिरोंचा पोलिसांच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.