मुलचेरा तालुक्यातील मोहुरली, लगाम, देवदा, अंबेला या गावांना पेसा क्षेत्रात समाविष्ट करण्यात यावा

289

प्रतिनिधी//रूपेश सलामे

मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime

अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद मुलचेरा व गावातील लोकांची मागणी

गडचिरोली:- मुलचेरा तालुक्यातील मोहुरली, लगाम, देवदा, अंबेला या गावांना पेसा क्षेत्रात समाविष्ट करण्यात यावा व मौजा रेंगेवाही तह. मुलचेरा जिल्हा गडचिरोली येथील शालेय इमारतीची दुरुस्ती करता निधी उपलब्ध करून देण्याची अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेरा व नागरिकांची अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. धर्मराव बाबा अत्राम यांच्याकडे मागणी.

मौजा रेंगेवाही तह. मुलचेरा जिल्हा गडचिरोली येथे जिल्हा परिषद शाळा असुन या सत्रात ४२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
शाळेत १ ते ५ वर्ग आहेत परंतु विद्यार्थ्याना बसायला वर्गखोल्या फक्त दोन आहेत.
विद्यार्थ्याना बसायला वर्गखोल्या कमी असल्याने अडचण निर्माण होत आहे.
एक वर्गखोलीची डागदुजी व शाळेच्या आवारात फर्शी बसविल्यास पावसाळ्यात विद्यार्थ्यांची फार मोठी अडचण दूर होईल.
अशी मागणी यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. धर्मराव बाबा अत्राम, जिल्हाधिकारी संजय दैने, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्याकडे करण्यात आली.

यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद मुलचेरा तालुका अध्यक्ष सतीश पोरतेट,महेंद्र आत्राम,शेखर नैताम,रामदास आलाम,केजीकराव आरके,संदिप तोरे,सचिन कडते,सोनु मडावी,दिनेश मडावी,शंकर रामटेके उपस्थीत होते.