बदलापूर अत्याचार प्रकरण: एटापल्लीत महाविकास आघाडीचे संविधान चौकात निदर्शने

178

प्रतिनिधी: तेजेश गुज्जलवार

मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime

एटापल्ली, २४ ऑगस्ट २०२४: बदलापूर येथे एका मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आज एटापल्ली येथील संविधान चौकात महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी सकाळी ११ वाजता एकत्र येऊन जोरदार निदर्शने केली. या निदर्शनांमध्ये काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर जनसंघटना AISF, किसान सभा, आयटक, व विविध सामान्य नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रमुख नेत्यांमध्ये भाकपा अहेरी विधानसभा प्रमुख काम्रेड सचिन मोतकुरवार, काँग्रेस शहर अध्यक्ष सतीश मुप्पलवार,काँग्रेस नगरसेवक निजान पेंदाम, प्रज्वल नागूलवार, कॉ. जुबेदा शेख, कॉ. शरीफ शेख,कॉ विशाल पूज्जलवार, AISF चे शिवाजी नरोटी, नामदेव हिचामी पाणी पुरवठा सभापती उबाठा, आणि लोकेश गावडे यांचा समावेश होता.

या निदर्शनांदरम्यान, उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी केली. “बेटीयों को सुरक्षा दे ना सके, वो सरकार निक्कमी है,” आणि “जो सरकार निक्कमी है, वो सरकार बदलनी है,” अशा घोषणांनी संविधान चौक दणाणून गेला.

नेत्यांनी त्यांच्या भाषणांमधून महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर तीव्र चिंता व्यक्त केली आणि सरकारला धारेवर धरले. त्यांनी या घटना वाढत्या प्रमाणात होण्यावर कठोर पावले उचलण्याची आणि महिलांच्या संरक्षणासाठी कठोर कायदे व त्वरित कारवाईची मागणी केली आणि महिलेला शाळेत, कामाचं ठिकाणी सुरक्षा द्यावी अशी मागणी सुद्धा धरली