सागर उरेत ला मिळाला स्वराज्य फाउंडेशनची मदत

118

मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime

आलापल्ली :सागर उरेत वय 20 वर्ष राहणार आंबटपल्ली हा मागील एक आठवड्यापासून काविळ ह्या रोगाने त्रस्त होता त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने तो कोणत्याही रुग्णालयात जाऊ शकला नाही त्यामुळे त्याला काल जास्त त्रास होऊ लागला व तो बेशुध्द अवस्थेत घरी पडलेला होता शेजाऱ्यांनी त्याला बघितले व अहेरी येथील रुग्णवाहीकेसाठी संपर्क केला परंतु कोणतीच रुग्णवाहिका उपलब्ध होत नव्हती आणि त्याची टब्बेत आणखी खालावत होती तेव्हा गावातील लोकांनी बैल बंडीतून त्याला अहेरी येथील रुग्णालयात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला व ते अहेरी साठी निघाले सदर बाब स्वराज्य फाऊंडेशन चा पदाधिकाऱ्यांना कळताच त्यांनी स्वराज्य फाऊंडेशन ची रुग्णवाहिका घेऊन आलापल्ली वरून आंबटपल्लिकडे निघाले होते तेव्हा गोमनी येथे त्यांना बैल बंडीवरून रुग्ण नेताना दिसले त्यांनी लगेच सागर ला आपल्या रुग्णवाहिकेत टाकलं आणि अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालय येथे वेळेत पोहचवून त्याचे प्राण वाचविले
रुग्णाला मिळाल तात्काळ मदत गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात निःशुल्क रुग्णवाहिका सेवा स्वराज्य फाउंडेशन आलापल्ली तर्फे २४/७ उपलब्द आहे 🙏