मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime
*उपस्थित बजरंग दल, विश्व हिंदू परिषद अहेरी पदाधिकाऱ्यांचे तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी गडचिरोली , पोलिस अधीक्षक गडचिरोली व आरमोरी पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना निवेदन*
अहेरी :- 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी आरमोरी शहरातील रेस्टॉरंट मध्ये काम करणाऱ्या मुलीवर प्राण घातक हल्ला करण्यात आला. सदर पीडीतेला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.त्यामुळे ठाण्यात आरोपीविरोधात वाढीव कलम लावण्यात यावी.तसेच आरोपींचे इतर साथीदार व मुख्य सूत्रधार सोहेल शेख यांची पत्नी मोकळे असल्याने पीडितेवर अत्याचार होण्याची दाट शक्यता असल्याने पोलीस सुरक्षा पुरविण्यात यावी व आरमोरी शहरात व इतरही शहरात किंवा गावात भविष्यात असे प्रकारचे कृती होणार नाही हे नाकारता येत नाही.. याबाबत आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल…अशी मागणी बजरंग दल , विश्व हिंदू परिषद अहेरी चे पदाधिकारी निवेदनातून तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी,पोलिस अधीक्षक, आरमोरी पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना देण्यात आले.
तहसीलदार यांना निवेदन देतेवेळी. बजरंग दल प्रखंड संयोजक सचिन येरोजवार, विश्व हिंदू परिषद चंद्रपूर विभाग सहमंत्री अमित बेझलवार, देवेंद्र खतवार, बजरंग दल नगर संयोजक रोहन शुद्धलवार, संतोष मंचालवर, आकाश पुसालवार,विनोद धुर्वे, कार्तिक कोरेत व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.