मुकुंद जोशी यांनी केली कंत्राटी कर्मचाऱ्यांची फसवणूक. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचा भोंगळ कारभार. जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची मागणी

72

मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime

गडचिरोल्ली:/ प्रतिनिधी दि.२०/८/२०२४:-
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी शाळेत मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी मुकुंद जोशी यांना निविदा नुसार पत्रकार स्वयंसहाय्यता बचत गटाला काम देण्यात आले. त्यात सफाई कामगार , शिपाई , चौकीदार , आणि ईतर पदांची भरती करण्यात आली. परंतु नियुक्ती केल्यानंतर मुकुंद जोशी यांनी करारानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन दिले नसल्याने शेकडो कंत्राटी पद्धतीने काम करित असलेल्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली असल्याचा आरोप संतोष तलांडे यांनी केला आहे. मुकुंद जोशी यांनी स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण केले आहे. करारानुसार त्यांचे वेतनही बॅंक खात्यात जमा केले नाही. यांसारख्या अनेक मागण्या घेऊन संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदन देण्यात आले मात्र एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी हेतूपुरस्सर डोळेझाक करून कंत्राटी कर्मचाऱ्यांवर फार मोठा अन्याय केला आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या गाई सारख्या योजनेचा भोंगळ कारभार दिवसेंदिवस चव्हाट्यावर येत असुन मुकुंद जोशी यांच्या कंत्राटाचाही महाघोटाळा उजेडात येत आहे. मुकुंद जोशी यांच्या आरोग्य विभागातील सर्व कंत्राटाची सखोल चौकशी करून तात्काळ गुन्हा दाखल करावा. अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , गृहमंत्री देवेंद्र फडणवीस , विभागीय आयुक्त नागपूर विभाग नागपूर , जिल्हाधिकारी गडचिरोली , जिल्हा पोलिस अधीक्षक गडचिरोली , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांना दिले आहे. परंतु अजूनही करारानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन दिले नसल्याने सर्वत्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन गडचिरोली जिल्हा प्रशासनाने तातडीने चौकशीचे आदेश देऊन उचित कार्यवाही करावी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकित वेतन मिळवून द्यावे. अन्यथा शेकडो कंत्राटी पद्धतीने काम करीत असलेले कर्मचारी शासनाच्या, प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करेल यात शंका नाही.
मुकुंद जोशी यांनी पत्रकार स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी कंत्राट घेतले असून त्यांच्या सर्व कंत्राटी कामाची सखोल रितसर चौकशी करावी. अशी मागणी करण्यात येत आहे.
गडचिरोली जिल्हा प्रशासनाने मुकुंद जोशी यांनी पत्रकार स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने केलेल्या कामाची सखोल चौकशी करून कंत्राटी पद्धतीने काम करित असलेल्या कर्मचाऱ्यांवरील अन्याय , आर्थिक शोषण पंधरा दिवसात थांबविले नाही तर झालेल्या अन्यायाचा विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येणार असल्याचे मतही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासन आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी किती गांभीर्याने कारवाई करतात याकडे गडचिरोली जिल्हा वासियांचे लक्ष वेधले आहे..
गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त , मागास , आदिवासी बहुल , नक्षलग्रस्त उद्योगविरहीत असल्याने जिल्ह्यातील आदिवासी युवक व युवतींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन करोडो रुपये खर्च करित आहे. मात्र मुकुंद जोशी सारख्या दलाल, असंवेदनशील , भ्रष्ट कंत्राटदारांनी आदिवासी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे लाखो रुपये हडप केले आहे. यात प्रकल्प अधिकाऱ्याचा फार मोठा हिस्सा असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे. मुकुंद जोशी यांनी पत्रकार स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून शेकडो आदिवासी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण केल्याप्रकरणी तसेच मानसिक त्रास दिला असल्याने अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंध ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.