मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime
आलापल्ली:अहेरी तालुक्यातील पुसुकपल्ली,संड्रा व मोसम या भागातील वनमजुरांच्या कामाचा मोबदला बर्याच कालावधीपासुन थकीत होता त्यामुळे मजुरांची परवड सुरु होती.भाजपने या समस्येवर आवाज ऊचलून सोमवार पर्यंतचा अल्टीमेटम देवुन टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता.त्यानुसार आज कार्यालयात धडक दिली असता वनक्षेत्रपाल गणविर साहेबांनी मोबदला वळती करण्याची तांत्रीक प्रक्रीया सुरु झाल्याचे मजुरांच्या निदर्शनास आणुन दिले.दोन-तिन दिवसात सर्व मजुरांच्या खात्यात रक्कम जमा होणार असल्याची हमी दिली.मजुरांच्या शंकांचे निराकरण झाल्याने तुर्तास टाळे ठोकण्याचा निर्णय भाजप पदाधिकार्यांनी मागे घेऊन मजुरांचा प्रश्न मार्गी लावला.
प्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष मद्दीवार,महामंत्री अभिजीत शेंडे,विलास पोचमपल्लीवार,अंकुश शेंडे,प्रमोद भोयर,सागर बिट्टीवार,हर्षीत वर्मा इत्यादी पदाधिकारी ऊपस्थित होते.