प्रतिनिधी : तेजेश गुज्जलवार
मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime
विनोबा प्राथमिक तथा माध्यमिक आश्रम शाळा गेदा येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मुख्याध्यापक श्री. ताजणे सर, श्री. अलोन सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत रक्षा बंधन कार्यक्रम मोठ्या हर्षोउत्सवाने शालेय परिसरात पार पडला. त्यावेळी सर्व विध्यार्थीनि नि सर्व विध्यार्थीला राखी बांधून सन साजरा केला. उपस्थित कर्मचारी यांना सुद्धा राखी बांधली.
“वृक्ष वल्ली आम्हा सोयरे.. ”
जगदगुरू संत तुकोबा महाराज यांच्या अभंगातील ओवी प्रमाणे विनोबा आश्रम शाळा गेदा ता एट्टापल्ली जिल्हा गडचिरोली येथील विध्यार्थीनि रक्षा बंधन कार्यक्रमांचे औचित्य साधून वसतिगृहात झाड लावून परिसरातिल झाडांना सुद्धा राखी बांधून त्यांचे संवर्धन करण्याची शपत घेतली. “झाड माझा भाऊ” या संकल्पनेत नैसर्गिक बांधिलकी जोपासणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. म्हणून झाडाला राखी बांधून त्यांची निगा राखण्याचा विचार चिमुकल्या बालकांना सुखावणारा वाटला.
सर्व विध्यार्थीना रक्षा बंधन कार्यक्रमाचे महत्व समजावून सांगुण श्री मारकवार सर (अधीक्षक) यांनी विध्यार्थी ला गोड जेवण देवून झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली