उप पोलीस स्टेशन रेगुंठा येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य जनजागरण मेळावा संपन्न

151

       प्रतिनिधी//

  मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार

#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime

दि. 09/08/2024 रोजी

रेगुंठा : सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा येथे जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गडचिरोली जिल्हा पोलीस दलाचे वतीने पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून मा.श्री. निलोत्पल सा. पोलीस अधीक्षक गडचिरोली ,मा. श्री. कुमार चिंता सा.(अपर पो. अधीक्षक  प्रशासन ) ,मा.श्री.यतीश देशमुख सा . ( अप्पर पो.अधीक्षक अभियान) गडचिरोली, मा. श्री. एम. रमेश सा. अपर पोलीस अधीक्षक (प्राणहीता ) अहेरी, यांच्या संकल्पनेतून व श्री संदेश नाईक सर.उप विभागीय पोलीस अधिकारी, सिरोंचा यांचे मार्गदर्शनाखाली  उप पोस्टे रेगुंठा येथे “*भव्य जनजागरण मेळाव्याचे*”  आयोजन करण्यात आले.
     सदर मेळाव्याचे अध्यक्ष सपोनि. कृष्णा काटे, प्रभारी अधिकारी उपपोस्टे रेगुंठा तर कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ.झाडे प्राथमिक आरोग्य केंद्र मोयाबिनपेठा, श्री. सतिश कडार्ला सरपंच रेगुंठा , श्री वेंकट स्वामी कावरे पोलीस पाटील दर्शेवाडा, श्री चेन्नुरी पोलीस पाटील पिरमिडा तसेच पोउपनि नगराळे सा., पोउपनि शेलार सा. तसेच जिल्हा पोलीस अंमलदार व srpf चे अंमलदार उपस्थित होते. तसेच रेगुंठा हद्दीतील 120 ते 150 नागरिक उपस्थित होते. 
               सदर मेळाव्याची सुरुवात क्रांतीवीर शहीद भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. सदर मेळाव्याचे सूत्रसंचालन पोउपनि शेलार सा. यांनी केले तर  सदर मेळाव्याचे प्रमूख पाहूणे यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. तसेच अध्यक्ष प्रभारी अधिकारी श्री. कृष्णा काटे यांनी पोलिस दादालोरा खिडकी अंतर्गत येणाऱ्या विविध शासकीय योजना त्यासाठी लागणारे कागदपत्र बद्दल माहिती देऊन त्यांचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचे आवाहन करण्यात आले. सदर मेळाव्यात प्रमुख पाहुणे व पोस्टे अधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच उपस्थित नागरिकांची प्राथमिक आरोग्य केंद्र मोयाबिनपेठा यांचे कडून आरोग्य तपासणी करण्यात आली सेतू केंद्रमार्फत विविध प्रकारची कागदपत्रे काढून देण्यात आली तसेच पोस्ट विभागामार्फत भारतीय पोस्ट बँक अकाउंट काढण्यात आले.
  *   सदर जनजागरण मेळाव्याला उपस्थित नागरिकांना वृक्षरोपे,साडी,टोपली, मच्छरदाणी, मुलांकरता स्कूल बॅग,वही,पेन इत्यादी साहित्याचे वाटप  करण्यात आले.

       सदर मेळाव्यात उपस्थित नागरिकांना जेवनाची व्यवस्था करण्यात आली. पोउपनि नगराळे सा.यांनी उपस्थित मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार व्यक्त करून आभारप्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उप पोस्टे रेगुंठा येथील जिल्हा पोलीसचे  सर्व अधिकारी व अंमलदार, तसेच एसआरपीएफचे अधिकारी व अंमलदार यांनी मोलाचे सहकार्य केले