प्रतिनिधी//
सिरोंचा .. गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शेतकरी तसेच ट्रॅक्टर मालक व चालक यांना सूचित करण्यात येते की सध्या पावसाळ्यात शेती व पेरणीचे कामे चालु आहेत
शेतातील ट्रॅक्टरची कामे झाल्यावर ट्रॅक्टर बाहेर आणण्यापूर्वी ट्रॅक्टरच्या चक्काची माती तसेच ट्रॅक्टर काचव्हीलची माती शेतातच काढून ट्रॅक्टर बाहेर काढावेत माती न काढत रस्त्यावर चालविल्यास माती संपूर्ण रस्त्यावर पसरून अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी गडचिरोली तर्फे सर्व शेतकरी तसेच ट्रॅक्टर मालक/ चालक व जनतेस याद्वारे सूचित करण्यात येते की,शेतातील ट्रॅक्टरची कामे झाल्यावर ट्रॅक्टर बाहेर आणण्यापूर्वी ट्रॅक्टरच्या चक्के तसेच काचाव्हीलची माती शेतातच काढून ट्रॅक्टर रस्त्यावर काढावेत अन्यथा अशा ट्रॅक्टरविरुध्द दांडत्मक कारवाही करण्यात येईल सदर दंड हा रू 10 हजार पर्यंत असेल यांची कृपाय नोंद घ्यावी असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी गडचिरोली विजय चाव्हण यांनी कळविले आहे.