अहेरी तालुक्यातील राजाराम विजेचा लपंडाव, राजारामवासी त्रस्त , वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी.

115

प्रतिनिधी//

मुख्य संपादक तथा संचालक // सुरेश मोतकुरवार इंडियन दस्तक न्यूज नेटवर्क

#indianbastak#onlinenewsp ortal#social#education#political#enter tainment#crime

अहेरी: तालुक्यतील राजाराम येथे गावामधे सध्या स्थितीत विजेचा लपंडाव सुरू असून ,विजेची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दररोज खंडित विज पुरवठयामुळे राजाराम नागरीकांचे हाल होत असताना दिसून येत आहे. याकडे विद्युत विभागाचे लक्ष वेधूनही संबंधित विभागाने दुर्लक्ष केलेल्या नागरिकांतून नाराजगीचे सुर उमटत आहे तालुक्यातील अनेक गावांना वीज पुरवठा करण्यात आला आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून वीजपुरवठा दिवसातून दहा वेळा खंडित होत आहे . अशा परिस्थितीत वीज कर्मचाऱ्याची कमतरता भासत आहे .विजेच्या समस्येतून वेळेवर दिलासा मिळत नसल्याचे कारण आहे तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या विजेची समस्या खूप वाढलेली आहे गावात विद्युतची अपुरी सुविधा होत आहे वीज पुरवठा सुरळीत चालू ठेवावा अशी मागणी वीज ग्राहकाकडून होत आहे .सध्या उन्हाळ्याचे दिवसा असताना सुद्धा महावितरण कडून तीन-तीन दिवस वीज पुरवठा बंद केला जातो .याचा त्रास शेतकऱ्यांसह ग्रामीण भागातील नागरिकांना सुद्धा भोगाव लागत आहे. तरी विद्युत समस्याचे लवकरात लवकर समस्या मार्गी लावाव्यात अशी मागणी तालुकावासियाकडून करण्यात येत आहे.