रेतीघाटांना पर्यावरण विषयक अनूमतीसाठी १९ जून रोजी जनसुनावणी

89

प्रतिनिधी//

मुख्य संपादक तथा संचालक // सुरेश मोतकुरवार इंडियन दस्तक न्यूज नेटवर्क

#indianbastak#onlinenewsp ortal#social#education#political#enter tainment#crime

गडचिरोल्ली: रेती घाट लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यावरही प्रत्यक्ष रीतीच्या उत्खननासाठी पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी आवश्यक असते. जिल्हयातील ४९ रेती घाटांपैकी वाहतुकीसाठी रस्ता उपलब्ध असलेल्या ३३ रेतीघाटांना पुढील ३ वर्षासाठी पर्यावरण अनुमती प्राप्त करुन घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर यांना पत्र देण्यात आले होते. त्यानुसार आता १९ जून रोजी जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर पुढील ३ वर्षाकरीता (२०२७ पर्यंत) पर्यावरण अनुमती घेण्यासाठी प्रस्ताव मान्यतेकरीता सादर केला जाणार आहे.