भगवंतराव हायस्कुल कोत्तागुडम येथे तालुकास्तरीय निपुण उत्सव कार्यक्रम संपन्न

341

प्रतिनिधी//

सिरोंचा :- शैक्षणीक साहित्य व्दारे अध्यापन करून विद्यार्थ्यास अध्ययन योग्य व प्रभावीपने करावे जेणेकरून विद्यार्थ्याला देणार माहितीज्ञान फार काळ लक्षात राहु शकेल. असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात गटशिक्षणाधिकारी डी. नीळकंठम सर ह्यांनी केले.
भगवंतराव हायस्कूल कोत्तागुडम सिरोंचा येथे निपुण भारत अभियान अंतर्गत तालुकास्तरीय निपुण उत्सव कार्यक्रम घेण्यात आला आहे,
ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सिरोंचा चे गटशिक्षणाधिकारी डी. नीलकंठम, प्रमुख पाहुणे म्हणून भगवंतराव हायस्कूल कोत्तागुडम चे मुख्याध्यापक के.जी.जवाजी,प्रमुख अतिथी शिक्षण विस्तार अधिकारी सुधाकर टेकुल, केंद्रप्रमुख आर एम रच्चावार, नगरम चे सहाय्यक शिक्षक एस. बी. कुळसंगे सर ,मुख्याध्यापक श्रीनिवास पोन्नावार सर विषयसाधन व्यक्ती अनिल मेश्राम हे उपस्थित होते.
कार्यकमाचे प्रास्ताविक अनिल मेश्राम तर सुत्रसंचालन ग.सा.के.सिरोंचा चे विषय साधन व्यक्ती एच एस कोकोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन एम एच वरखे सर यांनी केले. प्रशिक्षणात एकूण नऊ केंद्रातील 40 ते 50 शिक्षकांनी सहभाग घेतला. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून एस.बी.टेकूल सर प्र.शि.वि.अ, एच एस कोकोडे, श्री.ए.एस.मेश्राम. सा.व्य.सिरोंचा यांनी जबाबदारी पार पाडली आहे,