भूमिपुत्रांचे विचार अंगिसात करा#संदीप कोरेत* आंबटपल्ली येथे भूमिपुत्र वीर बाबूराव शेडमाके यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रम

104

मुलचेरा तालुक्यातील आंबटपल्ली गावात वीर बाबूराव स्मारक समिती आंबटपल्ली यांच्या तर्फे. भूमीपुत्र वीर बाबूराव शेडमके यांच्या पुतळ्याचे अनावरण तसेच सल्ला गागरा शक्ती स्थापना सप्तरंगी ध्वजारोहन तथा सामूहिक विवाह सोहळा कार्यक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सोहळा कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमांचे अध्यक्ष तथा उद्घाटक म्हनून संदीप भाऊ कोरेत यांच्या हस्ते वीर बाबूराव शेडमाके यांच्या पुतळ्याचे रीतसर उद्घाटन कऱण्यात आले या कार्यक्रमांत तालुक्यातील जवळपास 50ते 60 गावांची उपस्थिती हजारोच्या वर होती या कार्यक्रमांत मंचावरून अध्यशिय भाषणातून संदीप भाऊ बोलले आदिवासी क्रांतिवीर बाबूराव शेडमाके या भूमीपुत्रांनी आदिवासी बांधवांच्या हक्कासाठी हसत हसत आपल्या प्राणाची आहुती देऊन इतिहासात अजरामर झाले जरी आमच्या इतिहासकाराणी त्यांचे नावं, काम त्याग कमी लेखले असले तरी, समाजासाठी व देशाच्या स्वांत्रतासाठी जंगोम सेना तयार करुन अंग्रेजना सडो की पडो करुन सोडणाऱ्या या विराची वीरता नाकारू शकत नाही त्यांचा शोर्य व धेर्यासाठी भारत सरकारने त्यांच्या जन्मदिवशी 12 मार्च 2007रोजी भारतीय पोस्टव्दारे त्यांचा नावाचा शिक्का जारी केला दरवर्षी आपण वीर बाबूराव शेडमाके यांच्या जन्म दिवशी मोठया संख्येने एकत्र येऊन जयंती साजरी करतो पण आजही आपल्या समाजावरील अन्याय म्हणा की समस्या सुटल्या नाहि आहे ते वाढतच चालले आहे म्हणूनच प्रत्येक समाज बांधवांनी भूमिपुत्रांचे विचार अंगिकारून आपल्या समाजावर होणाऱ्या अन्यायाचा विरूद्ध समाजाने एकत्र येवून या समस्येचे धैर्याने निकारान करण्याचे गरज आहे आणि हिच आपल्या शहिदांना खरी श्रद्धांजली ठरेल असे बोलले तेव्हां मंचावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कांकडालवार माजी पंचायत समिती सभापती सुवर्णा येमुलवार श्रीनिवास जवा, वसंत डूर्के, विजय नल्लावार, संतोष चंदावार, संदीप चंदावार,
प्रमुख उपस्थिती, ऋषी सडमेक, युक्तेशवर मडावी शंकर मडावी देवाजी दब्बा, नालमवार सावकार, सतिश पोरर्तेट, व ईतर प्रतिष्ठित मंडळी होते या कार्यक्रमांचे प्रास्ताविक अर्पिता सडमेक हिने केले तर सूत्र संचालन व आभार उमेश कडते सरपंच ग्राम पंचायत आंबटपल्लीयांनी केले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिवाकर सडमेक कैलास मडावी गुरूदास मडावी हरिदास मराठे अनिल मेश्राम संजू पुरकलवार, पत्रू सिडा म विजय मडावीखुशाल मडावी, महादेव आलम, मनोज कलसर, विजय आत्राम, बिशजा उसेंडी, विजय मेश्राम, दिवाकर उरेते, राकेश मेश्राम सुधाकर मेश्राम, साईनाथ मेश्रामव गावांतील ईतर महिला पुरुष आदिनी सहकार्य केलें