*एटापल्ली:-* तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासी बहुल वांगेझरी येथे सुसज्ज समाज मंदिराचे बांधकाम होणार असून नुकतेच माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले.
वांगेझरी येथील नागरिकांनी गावात समाज मंदिर बांधकाम करण्याची मागणी केली होती त्या अनुषंगाने सुसज्ज असा समाज मंदिर बांधकामासाठी तब्बल दहा लाखांची निधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी उपलब्ध करून दिली आहे. या निधीतून गावात सुसज्ज समाज मंदिर बांधकाम केले जाणार आहे. गावकऱ्यांची बरेच दिवसांची मागणी पूर्ण झाल्याने गावकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच नेत्या भाग्यश्रीताई आत्राम यांचे आभार मानले.
नुकतेच वांगेझरी गावात भेट देऊन भाग्यश्री ताई आत्राम यांनी या कामाचे भूमिपूजन केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे एटापल्ली तालुका अध्यक्ष श्रीकांत कोकुलवार, भूमिया झुरू झोरे, गणेश झोरे, ज्योती झोरे, मंगलदास शेंडे, सरिता शेंडे,वीणाबाई गेडाम,मनोज कोवासे, शालिक शेंडे, गणेश झुरे, सुरेश शेंडे, जितेंद्र मोहूर्ले, तसेच आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.