अंकीसा ग्रामपंचायतीचे रूप पालटणार; दीड कोटींच्या निधीतून होणार विकास कामे

79

#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#

प्रतिनिधी//

भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते विकास कामांचे भूमिपूजन

सिरोंचा:राज्याच्या शेवटच्या टोकावरील आणि छत्तीसगड सीमेवर वसलेल्या अंकीसा ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट गावात तब्बल दीड कोटींच्या निधीतून विविध विकास कामे केली जाणार असल्याने या ग्रामपंचायतीचे रूप पालटणार आहे.

नुकतेच या अंकीसा आणि या ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट विविध गावांत भेटी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी विविध विकास कामांचे भूमिपूजन केले.यात खडीकरण,सिमेंट रस्ते,नाली बांधकाम तसेच आदी कामांचा समावेश आहे. विकास कामांचा भूमिपूजन प्रसंगी येथील सरपंच सरिता पेदा,प्रभाकर शानगोंडा,कार्तिक जणगाम,मांतय्या अत्यम,गणेश टेकाम,नागमनी टेकाम,वैकुंठम गोलकोंडा,तिरुपती कतला,वेंकटेश्वर शानगोंडा,रमेश कस्तुरी,तिरुपती जाडी,श्रीनिवास बेडके आदी उपस्थित होते.

अंकीसा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांचा विकास करण्यासाठी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी तब्बल दीड कोटी रुपयांची निधी दिली आहे.या माध्यमातून विविध गावात मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामे केले जाणार आहेत. दुर्गम भागातील गावांच्या विकासासाठी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी एवढी मोठी निधी दिल्याने गावकऱ्यांनी आभार मानले.

नुकतेच माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम या भागाचा दौरा करीत नागरिकांशी आस्थेने संवाद साधत विकास कामांचा शुभारंभ केला.यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.