प्रतिनिधी//
गडचिरोली:- दि.९ ऑगस्ट २०२३ रोजी गडचिरोली शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीचे नेतृत्व अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे यांनी केले. रॅलीची सुरवात बाबुराव मडावी चौक येथून होऊन सांस्कृतिक सभागृहात ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन व सर्व संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रम स्थळी समाप्त झाली. यावेळी शिवानी तलांडे, योगिता शेडमाके,हसीना कांदो,सुरज मडावी, संपर्कप्रमुख बादल मडावी, मिडिया प्रमुख रुपेश सलामे, कैलाश गेडाम यांच्यासह मोठ्या संख्येने संघटनेचे कार्यकर्ते व शहरातील नागरिक हजारोच्या संख्येने उपस्थित होते.