महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने खुल्या प्रवर्गासह राज्यातील संपूर्ण st sc व obc प्रवर्गाचे पण सर्वेक्षण होणार सर्व आदिवासी बांधवानी सर्वेक्षणात आदिवासी म्हणूनच नोंदणी करा: सतिश पोरतेट

539

सर्व आदिवासी बांधवानी सर्वेक्षणात आदिवासी म्हणूनच नोंदणी करा: सतिश पोरतेट तालुकाध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेरा

गडचिरोली:- सन्माननीय आदिवासी माझा समाज यांना सुचित करण्यात येते की,दि.23 जानेवारी 2024 ते दि.30 जानेवारी 2024 पर्यंत मराठा समाज आरक्षणाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने खुल्या प्रवर्गासह राज्यातील संपूर्ण st sc व obc प्रवर्गाचे पण सर्वेक्षण होणार आहे. तरी सर्व आदिवासी बांधवाना एक नम्र विनंती आहे की,ज्यावेळी सर्वेक्षण करण्यासाठी प्रगणक आपल्या घरी येतील, त्यावेळी आपण सर्वानी त्याच्याकडे आपल्या जातीची नोंदणी करताना हिन्दू-ठाकर ठाकुर किंवा हिन्दू कोळी …अशी न करता फक्त आदिवासी म्हणूनच नोंदणी करावी

कारण या निमित्ताने महाराष्ट्रामधील आपली एकूण आदिवासी समाजाची लोकसंख्या तर स्पष्ट होईलच परंतू त्याच बरोबर महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकड पण आपली आदिवासी म्हणून च नोंदणी देखील होईल.आज ही बऱ्याच जणाना अस वाटत की,आपण हिन्दू म्हणून नोंदणी केली तर आपणास आदिवासी म्हणून जातीचे प्रमाणपत्र मिळेल का,मिळाले तर आदिवासी म्हणून त्याची जात पडताळणी होईल का,परंतू मित्रानो या सर्व गोष्टी अतिशय सुलभ पणे होत आहेत त्याची काही ही काळजी करु नका.म्हणून सर्वानी सर्वेक्षण करताना आपल्या जातीची नोंदणी शक्यतो आदिवासी म्हणूनच करावे असे आव्हान अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेरा तालुका अध्यक्ष सतीश पोरतेट यांनी केले आहे.