चिरेपल्ली येथील आदिवासी समाज बांधवांचा पुढाकार
*◆अहेरी◆*:*तालुक्यातील खांदला ग्राम पंचायत हद्दीतील चिरेपल्ली हे गाव शहरी भागापासून दूर असून गावात ये-जा करायला रस्ता नसून सामाजिक व व्यक्तिक कार्यक्रमात बिछायत चे सामान व साऊंड सिस्टीम चे साहित्य साठी बिछायत केंद्र कडून ज्यादा चे पैसे गावकऱ्यांकडून वसूल करत असून त्यामुळे चिरेपल्ली येथील आदिवासी समाज बांधवांनी लोक वर्गणीतुन गावासाठी बिछायत चे साहित्य व साऊंड सिस्टीम घेण्याचे ठरविले त्यानंतर गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या निवासस्थानी भेट घेऊन ही बाब सांगितल्यावर माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी तात्काळ आर्थिक मदत करून भविष्यात चिरेपल्ली गावासाठी व आपल्या आदिवासी समाजासाठी मी वेळोवेळी सहकार्य करणार असल्याचे आस्वाशन दिले,आर्थिक मदत मिळाल्याने चिरेपल्ली गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांचे आभार मानले.*
*आर्थिक मदत देते वेळी माजी उपसरपंच भगवान मडावी,माजी उपसरपंच गुरुदास पेन्दाम,प्रदिप पेन्दाम,गणेश मडावी,मोरेश्ववर आलाम,रघुनाथ मडावी,रावजी गावडे,संतोष मडावी,जुलेख शेख,विनोद कावेरी,माजी सरपंच विजय कुसनाके,सुधाकर कोरेत उपस्थित होते.*