राजमाता राजकुंवरबाई विद्यालय एटापल्ली येथे सावित्रीच्या लेकींना सायकलीचे वाटप

79

राजमाता राजकुंवरबाई विद्यालय एटापल्ली येथे सावित्रीच्या लेकींना सायकलीचे वाटप

एटापल्ली:- दिनांक.23 जानेवारी 2024 रोज मंगळवारला शालेय क्रिडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन श्री.निखिल कुमरे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती एटापल्ली यांचेतर्फे संपन्न झाले.दिनांक.23,24,व 25 जानेवारी या तीन दिवसात सांघिक व वेयक्तिक खेळ व सांकृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
या उदघाटन सोहळ्याचे औचित्य साधून राजमाता राजकुंवरबाई विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली या शाळेत शिक्षण घेणाऱ्या व 5 कि.मी.पासून ये-जा करणाऱ्या मुलींना शासनतर्फे मानव विकास योजनेअंतर्गत सायकलींचा लाभ दिला जातो राजमाता राजकुंवरबाई विद्यालय तथा कनिष्ठ महविद्यालय एटापल्ली या शाळेतील 24 मुलींना सायकलीचे वाटप श्री.निखील कुमरे गटशिक्षणाधिकारी एटापल्ली यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सौ.अरुणा बर्लावर केंद्रप्रमुख एटापल्ली, श्री.किशोर खोब्रागडे विषय तज्ञ, श्री पूरकलवार सर केद्र्प्रमुख बुर्गी, श्री बंडावर मुख्याध्यापक राजमाता राजकुंवरबाई प्रायमरी स्कूल एटापल्ली, श्री.चालूरकर सह.शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.नारायण बोरकुटे प्राचार्य राजमाता राजकुंवरबाई विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली हे होते. याप्रसंगी श्री.निखील कुमरे यांनी आपल्या उदघाटनीय भाषणात सुप्त गुणांना वाव देऊन विद्यार्थ्यानी प्रगती करावी असे सांगितले व तसेच उपस्थित श्री.पूरकलवार केंद्र्प्रमुक, श्री.किशोर खोब्रागडे, सौ.अरुणा बर्लावर केंद्रप्रमुख आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य नारायण बोरकुटे यांनी विद्यार्थ्याना खेळाचे माध्यमातून आपले शरीर सुदृढ बनवावे, तसेच खेळाडू वृत्ती जोपासून खेळाचा आनंद घ्यावा असे सांगिले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.रविंद्र ठाकरे जेष्ठ शिक्षक यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन सौ.वंदना उपगन्लावार मेडम यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा.तानाजी धोंगडे यांनी मानले. याप्रसंगी प्रा.प्रभू डोंगरवर, श्री.यादव मडावी तसेच नागेश झिंका,संघपाल बोरकर,उषन्ना मेडीवार,शांताताई सोमनकर यांनी कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
कार्यक्रमप्रंसगी विद्यार्थी विद्यार्थींनिंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य केले तसेच स्वयंसेवकांनी सुद्धा परिश्रम घेतले.