नरभक्षी वाघाने पुन्हा एका इसमाचा केला खात्मा मूलचेरा तालुक्यातील लोहारा येथील घटना

344

मुलचेरा: तालुक्यात नरभक्षी वाघाचे दहशत दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण फसरले आहे.
चिंतलपेठ येथील महिला व कोळसापुर येथील महिलेला हल्ला करून जागीच ठार मारला असून त्या पाटोपाठ लोहारा येथील बापु आत्राम या इसमाला वाघाने ठार मारले आहे.
सदर इसम दोन दिवसापासून बेपत्ता असल्याचे माहिती मिळताच गावकऱ्यांनी जंगलात शोधाशोध सुरू केला असता आज सकाळी ९ च्या सुमारास त्याचा मृतदेह लोहारा व रेंगेवाही जंगलात आढळला आहे. ही माहिती वन विभागाला कळविण्यात आले.