सिरोंचा येथे डिजीटल मीडिया पत्रकार संघटनेकडून पत्रकार दिवस थाटात संपन्न

60

सिरोंचा तालुका डिजीटल मीडिया पत्रकार संघटनेची नवीन कार्यकारिणी गठीत

*सिरोंचा*…मराठी पत्रकार सृष्टीचे जनक,दर्पणकार,आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा सिरोंचा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेकडून पत्रकार दिनाचे कार्यक्रम थाटात संपन्न झाला.

पत्रकार दिनानिमित्त स्थानिक विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमाची सुरुवात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या फोटोला माल्यार्पण करून करण्यात आली.यावेळी उपस्थित सर्व पत्रकारांनी पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.यावेळी पत्रकार बांधवांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकले.

या कार्यक्रमात पत्रकार दिनाचे औचित्य साधून सिरोंचा तालुका डिजीटल मीडिया पत्रकार संघाची पुढील एक वर्षासाठी नवीन कार्यकारिणी डिजिटल मीडिया अध्यक्ष सागर मूलकला यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आली.

या नवीन कार्यकारिणीत सिरोंचा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे अध्यक्ष म्हणून रवीभाऊ सल्लम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.तसेच उपाध्यक्ष म्हणून सागरभाऊ मूलकला,सचिव म्हणून रवी बारसगांडी,संघटनेचे सल्लागार म्हणून श्यामभाऊ बेज्जनी वार,संघटक म्हणून साईनाथ दुर्गम यांची एकमताने निवड करण्यात आली.

पत्रकार दिनाचे कार्यक्रमाला सागर मूलकला,श्यामभाऊ बेज्जनीवार, रवि सल्लम,मुरलीधर मारगोनी,सुधाकर शिडम,आनंद आशा,रवि बारसगांडी,साईनाथ दुर्गम,विनोद नायडू,नवीन दिकोंडासह ग्रामीण भागातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.पत्रकार संघटनेची नवीन कार्यकारिणी व पत्रकार दिवसाचे कार्यक्रम खेळीमय वातावरणात पार पडला.सिरोंचा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेची नवीन कार्यकारणीचे सर्वस्तरावरून अभिनंदनाचे वर्षाव होत आहे.