माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम वेनलाया येथे भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन थाटात संपन्न

109
  1. ग्रामीण भागात व्हॉलीबॉल सारख्या स्पर्धा होणे गरजेचे- राजे अम्ब्रिशराव आत्राम

    सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम वेनलाया येथील राजे व्हॉलीबॉल क्लब तर्फे ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजन करण्यात आले.या स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्याचा कार्यक्रम माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभ हस्ते पार पडला. गावात आगमन होताच गावकऱ्यांनी राजें साहेबांचा मोठया जल्लोषात स्वागत केले!

    ग्रामीण भागातील खेळाडू हे शेतात काम करुन उरलेल्या वेळात आपला छंद जोपासतात. ही एक आनंदाची बाब आहे.अलीकडच्या काळात अतिदुर्गम ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात खेळांच्या स्पर्धा होण्याचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंची प्रतिभा समोर येत आहे. स्पर्धेमुळे खेळाडूना प्रोत्साहन मिळत आहे.त्यामुळे ग्रामीण भागात ठीकठिकाणी अशा स्पर्धा होणे गरजेचे आहे.असे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले!

    याप्रसंगी प्रमुख अध्यक्ष म्हणून युवानेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम, प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे तालुका अध्यक्ष दिलीप सेनिगारपू , शंकर नरहरी,श्रीकांत शुगरवार,मनोज मंच्चालवार ,मल्लन्ना संगर्ती, मधुकर नीलम, स्वप्निल पेद्दी,संतोष पडालवार संपत दाया, चंद्रशेखर चेंम्माकारी,शाहरुख पठाण यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते!👇🌷