सिरोंचा येथे दोन दिवसीय वार्षिक महोत्सव संपन्न
सिरोंचा :फुले,शाहु,आंबेडकरांच्या विचाराचे विद्यार्थी घडल्यास समाजाचा विकास शक्य असल्याचे प्रतिपादन आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आ. दिपकदादा आत्राम यांनी केले.सिरोंचा येथे मिलिंद बहुद्देशीय विकास संस्था व नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आयोजीत सांस्कृतिक परिवर्तन दिनानिमित्याने फुले-शाहू-आंबेडकर वार्षिक महोत्सव निमित्त तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवनावरील नाटकाच्या उद्घाटनीय भाषणातून बोलत होते.
या वेळी मंचावर मंडळाचे अध्यक्ष जोडे सर,एससी संघर्ष समितीचे अध्यक्ष शंकर बोरकूट,मादाराम ग्रामपंचायत सरपंच दिवाकर कोरते,आविस सल्लागार विजय रेपालवार,बामणी चे माजी सरपंच व्यंकटी कारसपल्ली, मादाराम ग्रा प चे माजी सरपंच इरपा मडावी,चिंतलपल्ली चे माजी सरपंच जानकी श्रीनिवास,रवी बोंगोणी,वेलगुर ग्राप चे उपसरपंच उमेश मोहूर्ले, जिमलगट्टा ग्रामपंचायतचे माजी सदस्य ईश्वर कोटा,जितेंद्र गड्डमवार,माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,अंकुश दुर्गे,चंद्रमोगली माडेम,एदुरू समय्या,आविस सल्लागार वाईल तिरुपती,नारायण मुडीमडगेला,व्यंकटस्वामी रामटेके, सुधाकर कोरते सह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलतांना माजी आ.दिपकदादा आत्राम यांनी सांगितले की दरवर्षी या कार्यक्रमनिमित्त महाराष्ट्र,तेलंगाणा व छत्तीसगड येथील बहुजन समाज बांधव एकत्र येतात.या दोन दिवसीय संमेलनात प्रमुख मान्यवरांचे मार्गदर्शन आपल्याला ऐकायला मिळते.त्यामुळे थोर महात्म्यांनी समाजासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण कामाची माहिती युवा वर्गाला मिळते आणि त्यातूनच युवापिढीत फुले,शाहू,आंबेडकरांचे विचार रुजतात.
सांस्कृतिक परिवर्तन दिनानिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रम घेतले जाते.कमिटी तर्फे मला नेहमीच आवर्जून निमंत्रण दिले जाते.मी नेहमीच अश्या समाजहिताच्या कार्यक्रमांना मदत करत आलो आहे आणि पुढे पण मदत करत राहणार असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले.यानिमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमासाठी त्यांनी शुभेच्छा दिले.