बस स्थानकाचे काम अपूर्ण असतांना लोकार्पण करायला घाई का केली, S.T. अधिकाऱ्यांना राजेंनी विचारला जॉब.
अहेरी विधानसभा क्षेत्राचे मध्यवर्ती ठिकाण मनून आलापल्ली येथे राजे अम्ब्रिशराव पालकमंत्री असतांना २०१९ ह्यावर्षी मंजूर झालेले आलापल्ली बस स्थानकाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले, ह्या नवीन बस स्थानकाला नुकतेच माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिसराव आत्राम यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच ह्यावेळी उपस्थित प्रवाशांशी संवाद साधला तेंव्हा काम अपूर्ण असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना मोठी गैरसोय होत असल्याचे राजेंना लक्षात आले.
1राजेंनी ह्यावर लगेच S.T. चा वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून संपूर्ण माहिती घेतली, अपूर्ण असलेले काम लगेच पूर्ण करून प्रवाशांना सर्व सोई उपलब्ध करून देण्याचा सूचना त्यांना दिल्या तसेच आलापल्ली बस स्थानकाचे काम अपूर्ण असतांना लोकार्पण करायला इतकी घाई का केली..?? ह्याचा जॉब ही राजेंनी विचारला, ह्यावर तातडीने अपूर्ण असलेले वाहनतळ आणि इतरकामे पूर्ण करू असे आश्वासन S.T. अधिकाऱ्यांनी राजेंना दिले, ह्यावेळी भाजपाचे अहेरी तथा आलापल्ली येथील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.