प्रतिनिधी//
अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला येथील स्थानिक रहिवासी श्री. बाबुराव दुर्गे वय-40 वर्षे हे दिर्ग आजाराने ग्रस्त होते त्यांना अनेक दवाखान्यात दाखल करून उपचार सुध्दा करण्यात आले . परंतु पाहिजे तितका आराम झाले नाही. कुटूंबातील सदस्यांनी त्यांना घरीच ठेवून उपचार सुरू होता.. पण दिवसेंदिवस आजारात कुठली समाधानकारक सुधारणा झाली नाही.
शेवटी ते बाबुराव दुर्ग आजारातच मागील काही दिवसा आदी त्यांच्या मृत्यु झाले. त्यांच्या नंतर परिवारात त्यांची पत्नी आणि दोन मुली आहेत. त्या परिवारावर दुःखाचे डोंगर पडले आहे.
पण ही बाब कार्यकर्त्यांनी अहेरी इस्टेटचे दानशूर राजे तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या लक्षात आणून दिली.त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपले कार्यकर्ते पोशालू सुधरी व विकास तोडसाम यांना पाठवून स्वर्गीय बाबुराव दुर्गे यांच्या कुटूंबाला मदतीचा हात देण्याकरिता सांगितले. आणि कार्यकर्त्यांनी स्वर्गीय बाबुराव यांच्या पत्नी रंजना बाबुराव दुर्गे यांना ५०००/- रुपयेचे आर्थिक मदत देण्यात आले.
आपण सर्वतोपरी पुन्हा सहकार्य करण्याचे आश्वासन सुध्दा यावेळी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दिले.
त्यावेळी विकास तोडसाम, पोशालू सूधरी, रवी पंजलवार,यशवंत कन्नाके, शंकर सिडाम विनोद सिडम, संतोष तोरे, मोनीश मोतकुरवार, धर्मा आत्राम, राकेश तलांडे, रुपेश पोर्टेत, महादेव आलाम, व्यंकटेस मडावी, बाबुराव चापले, जितेश सिडाम तसेच गावकरी व स्वर्गीय बाबुराव दुर्गे यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होत..!!