अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेराच्या पदाधिकाऱ्यांची शासकिय आदिवासी मुलांचे वस्तीगृहाला भेट #jantechaawaaz#news#portal#

69
प्रतिनिधी//

 दि. १७/०९/२०२३ रोजी अहेरी प्रकल्प कार्यालय अंतर्गत येणाऱ्या शासकिय आदिवासी मुलांचे वस्तीगृह, आलापल्ली येथे अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेराच्या पदाधिकाऱ्यांनी  घेतली भेट.

















यावेळी आहार व्यवस्थित मिळते काय, आरोग्य तपासणी नियमित होते काय, डिबीटीचे  पैसे मिळाले काय?असे विचारणा विद्यार्थांना करण्यात आली.

















वस्तीगृहातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,
 किचन, शौचालय आदींची पाहणी करण्यात आली. व विद्यार्थ्यांना  शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. नव्याने आलेल्या मुलांची रॅगिंग न करता त्यांना आपल्या  सोबत घेऊन अभ्यासाचा सराव करा,येथे एका कुटुंबप्रमाने रहा.तूम्ही स्वतः शिक्षण घेत मोठे झाले की, आई-वडील यांना सन्मान मिळेल याची जाणीव ठेवा. असे संघटनेचे पदाधिकारी मार्गदर्शन करताना म्हणाले















वस्तीगृहातील मुलांची भेट घेऊन चर्चा केली त्यांच्या समस्या जाणून घेतले, तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेरा
पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्याना दिले.


















यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद मुलचेरा तालुका अध्यक्ष सतिश पोरतेट यांच्यासह ऍडव्होकेट विनोद दहागावकर, अश्विनी मडावी, सुनील मडावी, सुरज आत्राम, शुभम निलम, मानतेस मडावी, सुरज मडावी, गजु आत्राम उपस्थित होते.