जाफराबाद येथील ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत बनली धोकेदायक; ताडपत्री बांधून चालतोय कामकाज

76

 

: सिरोंचा तालुक्यातील जाफराबाद येथील ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत जीर्ण झाली असून, या कार्यालयात बसून काम करणे जिकिरीचे व धोकेदायक बनले आहे.
ही इमारत केव्हाही कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने ग्रामपंचायतचा कारभार येथेच बसून केला जात आहे.

तालुक्यातील जाफराबाद येथील ग्रामपंचायत कार्यालयाची ही इमारत चाळीस वर्षांपूर्वीची असून, सद्य:स्थितीत ती जीर्ण झाली आहे. या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यात यावी, अशी मागणी करूनही मागणी मान्य होत नसल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे. इमारतीचा गिलावा, छत गळून पडत असून, भिंतींना भेगा पडल्या आहेत. त्यामुळे या इमारतीमध्ये बसून कामकाज करणे धोक्याचे बनले आहे. ही इमारत पाडून नवीन इमारत बांधण्यात यावी, यासंबंधीचा प्रस्ताव अनेक वर्षापूर्वी शासनाकडे दिला आहे.
यालाही आता पाच-सहा वर्ष झाली आहेत. परंतु, प्रशासन स्तरावर ग्रामपंचायत इमारत बांधण्याबाबतीत उदासीन भूमिका घेण्यात येत असल्याचा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमधून सांगण्यात येत आहे.
आता ग्रामपंचायतीच्या इमारतीवर ताडपत्री बांधून कामकाज चालवण्याची वेळ ग्रामपंचायत प्रशासनावर आली आहे.
आणि विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून लाईन नाही विद्युत मिटर महावितरण विभागाने विद्युत बिलाचा ग्रामपंचायत प्रशासनाने न भरल्याने काढून नेले असल्याचे कळते ग्रामपंचायत स्तरावर ऑनलाईन कामे करण्यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत स्तरावरुन केल्या जातात तर या ग्रामपंचायतीमध्ये विद्युत लाईन बंद नसल्याने येथील ग्रामस्थांना आपले शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन कामे करण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे व याच कामाकरीता तालुक्याच्या ठिकाणी जावून करावी लागत आहे आणि तालुक्याच्या ठिकाणी जावून कामे करणे म्हणजे जाण्या येण्याचा खर्च गरीब ग्रामस्थांना सोसावा लागत आहे करीता विद्युत बिलाचा भरणा करुन ग्रामपंचायत प्रशासनाने येथील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली जात आहे