लोककल्याणकारी योजनांची माहिती घेऊन पुरेपूर लाभ घ्या:भाग्यश्री ताई आत्राम

49

 

सिरोंचा नागरपंचयात तर्फे महिला सक्षमीकरण अभियान

सिरोंचा:महिलांचा आर्थिक विकास व्हावा तसेच त्यांचे सशक्तीकरण व्हावे यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत.केंद्र व राज्यसरकरच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती घेऊन महिलांनी त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले.१२ डिसेंबर रोजी सिरोंचा नागरपंचयात तर्फे महिला सक्षमीकरण अभियान घेण्यात आले.यावेळी या अभियानाच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी नागराध्यक्ष फरजाना शेख,उपाध्यक्ष बबलू पाशा,नायब तहसीलदार जनक काळबाजीवार,संवर्ग विकास अधिकारी विलास घोडे,पोलीस उपनिरीक्षक प्रांजली कुलकर्णी, एमएससीईबी चे कार्यकारी अभियंता नरवडे,सभापती भवानी गनपूरपू,नगरसेविका पदमा भोगे, सपना तोकला,महेश्वरी पेद्दापल्ली,जगदीश रालाबंडीवार,सतीश भोगे,रंजित गागापूरवार,नरेश अलोने,इम्तिहाज शेख,राजू पेद्दापल्ली,वेंकटलक्ष्मी आरवेली,करुणा जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना पुरुषांसोबत महिलांनाही समान हक्क देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून पुरेपूर प्रयत्न केले जात आहे.त्याअनुषंगाने काही महत्त्वाचे निर्णय देखील घेण्यात आले.भविष्यात प्रत्येक क्षेत्रात महिलांना समसमान हक्क असणार आहे.आपला परिसर आदिवासीबहुल भाग असल्याने विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपने राबविण्यात येत आहेत.मात्र,बरेच लोकांना या योजनांची विस्तृत माहिती नाही.त्यामुळे कुठलीही शंका मनात न ठेवता विविध विभागाशी संपर्क करून त्या प्रत्येक योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

सिरोंचा नागरपंचयात अंतर्गत एकूण १७ प्रभाग असून या प्रभागातील विविध गटातील महिलांसाठी महिला सक्षमीकरण अभियान घेण्यात आले.या अभियानात उपस्थित मान्यवरांनी महिलांना मोलाचे मार्गदर्शन करून योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.सदर अभियानात प्रत्येक विभागाकडून स्टॅल लावण्यात आले होते.आपापल्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची जनजागृती करून जास्तीत जास्त महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात आले.या अभियानात १७ प्रभागातील महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड खान यांनी केले.